18 September 2020

News Flash

अ. भा. वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धा : तन्वी लाड अंतिम फेरीत

मुंबईकर तन्वी लाडने अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत नागपूरच्या अरुंधती पनतावणेवर २१-१३, २०-२२, २१-१६ अशी मात केली.

| February 8, 2014 01:35 am

मुंबईकर तन्वी लाडने अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत नागपूरच्या अरुंधती पनतावणेवर २१-१३, २०-२२, २१-१६ अशी मात केली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत रितुपर्णा दासने पुण्याच्या अनुभवी सायली गोखलेवर २१-१७, २२-२० असा विजय मिळवला. पुरुषांमध्ये अव्वल मानांकित सौरभ वर्माने लहान भाऊ समीर वर्माचा २१-१६, २१-१५ पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
अक्षय देवलकर-प्रणव चोप्रा जोडीने सनावे थॉमस व रुपेश कुमार या अनुभवी जोडीवर २१-१६, २१-१७ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. महिला दुहेरीत प्राजक्ता सावंतने अराथी सारा सुनील जोडीने वर्षां बालेवाडी- निश्चिता जी.एम जोडीला २१-११, २१-१२ असे नमवत अंतिम फेरीत स्थान पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 1:35 am

Web Title: tanvi upsets arundhati sets title clash with rituparna
Next Stories
1 चार आंतरराष्ट्रीय नेमबाजांना ‘साइ’कडून अर्थसाहाय्य
2 हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : भारतीय खेळाडू आयओसीच्या ध्वजानिशी संचलनात सहभागी
3 गोलंदाजी योग्य झाली पण, ब्रेन्डनने प्रखर फलंदाजी केली- मुरली विजय
Just Now!
X