13 December 2019

News Flash

भारतीय संघाच्या माजी गोलंदाजाला गुंडांकडून मारहाण

या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, कानाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

अमित भंडारी (छाया - प्रविण खन्ना)

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अमित भंडारी यांना काही गुंडांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (DDCA) वरिष्ठ संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष असलेले भंडारी यांची दोन माणसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर हॉकी स्टिक, सायकलची चेन आणि तत्सम गोष्टी घेऊन आलेल्या सुमारे १५ गुंडांनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली असून सहकारी सुखविंदर सिंग यांनी त्यांना संत परमानंद रुग्णालयात दाखल केले.

२३ वर्षाखालील मुलांचे सराव सामने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स मैदानावर सुरु आहेत. या मैदानावर ते सकाळी आले होते. त्यावेळी २ माणसे त्यांना भेटण्यासाठी आली. त्यांच्याबरोबर भंडारी यांची शाब्दिक चकमक झाली. यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळातच सुमारे १५ गुंड सायकलची चेन, रॉड आणि हॉकी स्टिक्स घेऊन मैदानात आले आणि त्यांनी भंडारी यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान, मैदानावर असलेले खेळाडू आणि सहकारी यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गोळी मारून ठार करण्याची धमकी देण्यात आली, असे २३ वर्षाखालील वरिष्ठ संघाचे संघ व्यवस्थापक शंकर सैनी यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुंडानी तेथून पळ काढला. पण या प्रकरणामागे जे कोणी असेल, त्याची गय केली जाणार नाही, असे DDCA चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले. तसेच, या घटनेही आम्ही माहिती घेत असून त्या आधारावर FIR नोंदवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on February 11, 2019 4:14 pm

Web Title: team india former pacer amit bhandari assaulted by goons in delhi head injured
Just Now!
X