News Flash

Video : टीम इंडियात रंगलं सिक्सर चॅलेंज; पाहा कोणी मारली बाजी

तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाचा कसून सराव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतल्यानंतर, शुक्रवारी रांचीच्या मैदानात दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. या सामन्याआधी सरावादरम्यान भारतीय संघातल्या खेळाडूंनी उंच षटकार खेचण्याचा सराव केला. धोनी, रायुडू, शिखर धवन आणि चहल या खेळाडूंनीही या सरावात भाग घेतला. बीसीसीआयने भारतीय संघाच्या या षटकार सरावाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला चांगलंच झुंजवत बाजी मारली आहे. मात्र फलंदाजी हा भारतीय संघासाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे अनेकदा भारतीय संघ मैदानात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी फलंदाजीचाही कसून सराव केला.

तिसरा सामना जिंकून भारताला या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे मैदानात केलेला षटकारांचा सराव भारताला प्रत्यक्ष सामन्यात किती फायदेशीर ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 4:33 pm

Web Title: team indian players participate in sixer challenge in rachi find who wins the battle
टॅग : Ind Vs Aus
Next Stories
1 भारतीय संघाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
2 मैदानातील स्वतःच्या स्टँडचं उद्घाटन करायला धोनीचा नकार, म्हणाला मी तर घरातलाच माणूस !
3 All England Championships: चुरशीच्या लढतीत सायना विजयी
Just Now!
X