निर्णायक लढतीत गुप्ताची अधिबनवर मात
महाराष्ट्र बुद्धिबळ लीग
अलाहिदा लढतीत माजी राष्ट्रीय विजेता अभिजित गुप्ता याने बी.अधिबन याच्यावर मात केली, त्यामुळेच ठाणे कॉम्बॅटन्ट्स संघाने जॉन्सन टाईल्स करंडक महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविले. त्यांनी प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात जळगाव बॅटलर्सवर ४-३ असा विजय मिळविला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ठाणे व जळगाव यांच्यातील पहिल्या सहा लढतींअखेर ३-३ अशी बरोबरी झाली. त्यामुळे अभिजित गुप्ता व अधिबन यांच्यात अलाहिदा डाव खेळविण्यात आला.
जलद पद्धतीचा हा डाव गुप्ता याने जिंकला. अंतिम सामना रविवारी होणार आहे.