15 December 2017

News Flash

आनंदला अॅडम्सने बरोबरीत रोखले; संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने इंग्लिश ग्रँडमास्टर मायकेल अॅडम्सविरुद्धचा सामना अनिर्णीत राखला. आता ग्रेंके क्लासिक बुद्धिबळ

पीटीआय, बॅडेन-बॅडेन (जर्मनी) | Updated: February 14, 2013 5:31 AM

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने इंग्लिश ग्रँडमास्टर मायकेल अॅडम्सविरुद्धचा सामना अनिर्णीत राखला. आता ग्रेंके क्लासिक बुद्धिबळ स्पध्रेच्या सहाव्या फेरीअंती आनंद संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. आनंदने सहा लढतींमध्ये पाच सामने बरोबरीत सोडवून आपल्या खात्यावर ३.५ गुण जमा केले आहेत. तो जर्मन ग्रँडमास्टर अर्कदिज नॅदित्श याच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
इटलीच्या फबियानो करूआनाने जर्मनीच्या जॉर्ज मीयरविरुद्धची लढत बरोबरी सोडवून चार गुणांसह एकटय़ाने आघाडी टिकवून धरली आहे. स्पध्रेच्या आणखी चार फेऱ्या बाकी आहेत. आनंदे या स्पध्रेत तिसऱ्यांदा पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळ केला. अखेर ४१व्या चालीअंती दोघांनीही सामना बरोबरीत सोडविण्याचे मान्य केले.

First Published on February 14, 2013 5:31 am

Web Title: tie break for adams anand
टॅग Adams,Anand