कर्णधार स्मृती मानधनाने साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीला सोफी एकेलस्टोनच्या भेदक गोलंदाजीची अप्रतिम साथ लाभल्यामुळे ट्रेलब्लेझर्स संघाने महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात सुपरनोव्हास संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना स्मृतीने १० चौकार व तीन षटकारांसह ९० धावा फटकावल्यामुळे ट्रेलब्लेझर्सला २० षटकांत ५ बाद १४० धावांपर्यंत मजल मारता आली.

प्रत्युत्तरादाखल, जेमिमा रॉड्रिग्ज (२४), सोफी डीव्हाईन (३२) आणि हरमनप्रीत कौरच्या नाबाद ४६ धावांनंतरही सुपरनोव्हासला अपयशाचा सामना करावा लागला. २० षटकांत सुपरनोव्हासला ६ बाद १३८ धावांवर रोखण्यात ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांना यश लाभले. सोफी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत ट्रेलब्लेझर्सचा विजयात मोलाची भूमिका बजावली.

संक्षिप्त धावफलक

ट्रेलब्लेझर्स : २० षटकांत ५ बाद १४० (स्मृती मानधना ९०, हरलीन देओल ३६; राधा यादव २/२८) विजयी वि. सुपरनोव्हास : २० षटकांत ६ बाद १३८ (हरमनप्रीत कौर नाबाद ४६, सोफी डीव्हाईन ३२; सोफी एकेलस्टोन २/११).