22 September 2020

News Flash

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कपात करून ट्वेन्टी-२० लीग वाढवणार -कॅमेरून

उपखंडात क्रिकेटच्या वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत.

संग्रहित छायाचित्र

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून त्यांनी भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयीचा आपला दृष्टिकोन प्रकट केला. फुटबॉलप्रमाणेच कमीत कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि जास्तीत जास्त ट्वेन्टी-२० लीग खेळवाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.  कॅमेरून यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी अद्याप वेस्ट इंडिज मंडळाचा पाठिंबा मिळाला नसला तरी आपल्याकडे पुरेसी मते असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी ते म्हणाले की, ‘‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) प्रदीर्घ काळ व्हावी. तसेच इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लीगा आणि सेरी-ए फुटबॉल स्पर्धाच्या धर्तीवर जगातील सर्व ट्वेन्टी-२० लीग एकाच वेळी खेळवण्यात याव्यात. अफगाणिस्तान आणि आर्यलडसारख्या छोटय़ा देशांसाठी कसोटी क्रिकेट बंधनकारक नसावे तर त्यांच्या पसंतीचे असावे.’’

‘‘उपखंडात क्रिकेटच्या वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. चीन आणि अन्य देशांमध्ये क्रिकेट खेळाचा प्रसार करण्यास मला आवडेल, या योजनेत भारताचाही समावेश असावा,’’ असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:09 am

Web Title: twenty20 league will be expanded by reducing international cricket abn 97
Next Stories
1 “…तर रोहितची फटकेबाजी थांबवणं अशक्यच”
2 वेलकम ज्युनियर पांड्या! हार्दिक-नताशा जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव
3 हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; फोटो केला शेअर
Just Now!
X