कर्नाकटविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यासाठी मुंबईच्या संघात दोन डावखुऱ्या फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. डावखुरा फिरकीपटू इक्बाल अब्दुल्ला चांगल्या फॉर्मात नसला तरी त्याला संधी देत हरमीतलाही संघात स्थान देण्यात आले आहे. बडोद्याविरुद्धच्या गेल्या सामन्यात हरमीतला या मोसमातील पहिली संधी देण्यात आली होती. हा सामना ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे.

मुंबईचा संघ : आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुफियान शेख, शार्दुल ठाकूर, निखिल पाटील, अखिल हेरवाडकर, श्रीदीप मंगेला, बद्रे आलम, इक्बाल अब्दुल्ला, अक्षय गिरप, हरमीत सिंग आणि बलविंदर सिंग संधू (कनिष्ठ). प्रशिक्षक : प्रवीण अमरे.