पुण्याचा उदयन माने हा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दुसरा भारतीय गोल्फपटू ठरला आहे. याआधी अनिर्बान लाहिरीने ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे. अर्जेंटिनाच्या एमिलियानो ग्रिलोने क्वाड्रेनियल इव्हेंटमधून माघार घेतल्यामुळे ३० वर्षीय मानेला ऑलिम्पिक प्रवेश मिळाला आहे.

काही आठवड्यांपूर्वी अर्जेंटिनाने माघार घेतली. आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने यादी अपडेट केली, तोपर्यंत मानेला निर्णयाची प्रतीक्षा करावी लागली. माने म्हणाला, ”ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्याबद्दल मी खरोखर उत्साही आहे. पीजीटीआय २०२०-२१ मध्ये मी चांगली कामगिरी केली. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्रतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मला वाटत होते. परंतु यावर्षी भारतात झालेल्या लॉकडाऊनमुळे माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या होत्या.”

 

 

हेही वाचा – HBD DHONI : धोनीने आत्तापर्यंत किती पैसा कमावलाय?

चेन्नईमध्ये जन्मलेला माने आता आता पुण्यात राहतो. २०१५पासून तो पीजीटीआयमधील सर्वात यशस्वी गोल्फ खेळाडूंपैकी एक आहे. तो पीजीटीआयमध्ये ११ वेळा विजेता राहिला आहे. २०१५मध्ये दोन पदके जिंकणारा माने ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने उत्साहित आहे.