करोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धांचं आयोजन खोळंबलं आहे. काही स्पर्धा स्थगित, तर काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यूरो कपवरही करोनाचं सावट असल्याने गेल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नाही. यामुळे यावर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा पहिल्यांदाच ११ देश मिळून या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. यात अजरबैजान, डेनमार्क, इंग्लंड, जर्मनी, हंगेरी, इटली, नेदरलँड, रोम, रशिया, स्कॉटलँड आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. या स्पर्धेत २४ संघानी सहभाग घेतला असून ११ जुलै रोजी अंतिम सामना रंगणार आहे. असं असलं तरी खेळाडूंना करोनाची लागण झाल्यास काय करावं? याचा विचार समितीने आधीच केला आहे. त्याप्रमाणे पारंपरिक नियमांना फाटा देत नवे नियम आखण्यात आले आहेत. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन निर्विघ्नपणे पार पडणार आहे.

करोना संकटामुळे स्पर्धेचे नवे नियम

  • २६ खेळाडूंच्या फुटबॉल संघाला मंजुरी देण्यात आली आहे. असं असलं तरी प्रशिक्षकला आपल्या अंतिम संघात २३ खेळाडूंची नोंद करावी लागणार आहे. यात ११ खेळाडू मैदानात तर १२ खेळाडू राखीव असणार आहेत.
  • करोनामुळे जर काही खेळाडूंना तात्काळ क्वारंटाइन व्हावं लागलं. तरी संघाकडे १३ खेळाडू असतील. त्यामुळे सामना खेळला जाणार आहे.
  • करोनामुळे सामना झाला नाही तर त्या सामन्याचं ४८ तासात आयोजन करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तरीही सामना झाला नाही तर ज्या संघामुळे सामना रद्द झाला. त्या संघाला ३-० ने पराभूत समजलं जाईल.
  • करोनाचं संकट पाहता समितीने ५ बदली खेळाडूंची परवानगी देली आहे. यापूर्वी ३ बदली खेळाडू खेळवण्याची संमती होती. यामुळे खेळाडूंवरील दबाव कमी होणार आहे.
  • फुटबॉल स्पर्धा ९० मिनिटांची असते. मात्र अनिर्णित स्पर्धेमुळे वाढीव वेळ देण्यात येतो. अशावेळी सहावा बदली खेळाडू खेळवण्यास संमती देण्यात आली आहे.
  • ९० मिनिटांच्या खेळात खेळाडू बदलण्याच्या ३ संधी असतील. वाढीव वेळेत चौथ्या बदलला मंजुरी देण्यात आली आहे.

UEFA Euro Cup फुटबॉलचा इतिहास; ६० वर्षात झाले इतके बदल

आतापर्यत झालेल्या १५ स्पर्धाचं १४ देशांनी आयोजन केलं आहे. २०००, २००८ आणि २०१२ साली दोन देशांनी मिळून आयोजन केलं आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच ११ देश मिळून या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. साखळी सामने, बाद फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याचं आयोजन यजमान शहरांनुसार विभागलं गेलं आहे. यावेळी लंडन, ग्लास्गो, कोपेनहेगन, सेविल, बुडापेस्ट, अँम्सटर्डम, रोम, म्यूनिख, बाकू, बुखारेस्ट आणि सेंट पीटर्सबर्ग येथे सामने खेळले जाणार आहेत.

  • साखळी सामने, बाद फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना– लंडन
  • साखळी सामने आणि उपांत्यपूर्व फेरी– बाकू (अजरबैजान), म्यूनिख (जर्मनी), रोम (इटली), सेट पीटर्सबर्ग (रशिया)
  • साखळी सामने आणि बाद फेरी– अँम्सटर्डम (नेदरलँड), बुखारेस्ट (रोम), बुडापेस्ट (हंगेरी), कोपेनहेगन (डेनमार्क), ग्लास्गो (स्कॉटलँड), सेविला (स्पेन)

फुटबॉलसमोर क्रिकेट ‘फेल’, IPLपेक्षा ११ हजार कोटींनी नफा कमावणाऱ्या स्पर्धेला होतेय सुरुवात!

साखळी सामन्यांचं आयोजन

  • ग्रुप ए- रोम बाकू
  • ग्रुप बी- सेंट पीटर्सबर्ग, कोपनहेगन
  • ग्रुप सी- अँम्सटर्डम, बुखारेस्ट
  • ग्रुप डी- लंडन, ग्लास्गो
  • ग्रुप इ- सेविला, सेंट पीटर्सबर्ग
  • ग्रुप एफ- म्यूनिख, बुडापेस्ट

यूरो कप २०२०चं आयोजन गेल्या वर्षी होणार होतं. मात्र करोना संकटामुळे गेल्या वर्षीचं आयोजन टाळण्यात आलं. मात्र तरीही या स्पर्धेचं नाव UEFA Euro Cup २०२० ठेवायचा प्रस्ताव कार्यकारी समितीने मंजूर केला. २०२० साली या स्पर्धेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने या स्पर्धेची रुपरेषा आखण्यात आली होती. त्यासाठी या स्पर्धेचं नाव UEFA Euro Cup २०२१ ऐवजी UEFA Euro Cup २०२० असंच ठेवण्यात आलं आहे.