News Flash

टी-२० विश्वचषक रद्द झाल्यास आयपीएल नक्की खेळेन – डेव्हिड वॉर्नर

टी-२० विश्वचषकाचं आयोजन सध्याच्या घडीला आव्हानात्मक !

टी-२० विश्वचषक रद्द झाल्यास आयपीएल नक्की खेळेन – डेव्हिड वॉर्नर

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला. खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या साठी सप्टेंबर-नोव्हेंबरच्या काळात ही स्पर्धा भरवण्याच्या बीसीसीआयचे प्रयत्न आहेत. यासाठी आयसीसी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल काय निर्णय घेतं याची बीसीसीआयला वाट पहावी लागणार आहे.

टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु असले तरीही हे काम सोपं नसल्याचं मन खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. अशा परिस्थितीत टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्या आपण आयपीएलमध्ये जरुर खेळू असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे, तो ‘इंडिया टुडे’शी बोलत होता. “यंदाची विश्वचषक स्पर्धा होणार नसेल तर मी आयपीएलमध्ये नक्की खेळणार आहे. यासाठी आम्हाला क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड नक्की परवानगी देईल अशी मला आशा आहे.” डेव्हिड वॉर्नरनेही याआधी १६ संघाचा सहभागासह टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवणं आव्हानात्मक असल्याचं म्हटलं होतं.

यंदाची स्पर्धा रद्द होईल अशी चर्चा सुरु आहे. ही स्पर्धा खेळवायची जरी ठरल्यास प्रत्येक संघाला १४ दिवसांचा क्वारंटाइन पिरेड आणि त्यानंतर मग सराव आणि स्पर्धा हे आयोजन करणं मला आताच्या घडीला खरंच आव्हानात्मक वाटत आहे. माझ्यासह अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचंही वॉर्नरने यावेळी सांगितलं. त्यासाठी आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल नेमका काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 3:15 pm

Web Title: very sure of playing ipl if t20 world cup is postponed says david warner psd 91
Next Stories
1 होय, माझ्याकडून दोनवेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं गेलं ! – स्टिव्ह बकनर
2 Father’s Day 2020 : सचिन तेंडुलकर रमला बाबांच्या आठवणींमध्ये…
3 बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यने शेअर केला बाबांसोबत लहानपणीचा फोटो
Just Now!
X