News Flash

Video : …आणि धोनीने घेतला ड्रायव्हिंग सीटचा ताबा

मालिकेत भारताची २-० अशी आघाडी, शुक्रवारी धोनीच्या रांचीत तिसरा सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील २ सामने झाले असून भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना रांची येथे शुक्रवारी होणार आहे. रांची हे धोनीचे गाव असल्याने धोनीचे रांचीमध्ये दणक्यात स्वागत झाले. याबरोबरच रांचीत पोहोचताच धोनीने आपल्यातील वाहनप्रेमी पुन्हा एकदा दाखवून दिला. एका मोठ्या गाडीत धोनीने आपली कारचालकाची जागा पटकावत ड्रायव्हिंगचा आनंद घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam7) on

धोनीने गाडी चालवायला बसताच केदार जाधवदेखील लगेच त्याच्या बाजूच्या सीटवर बसला आणि त्याने गाडीतील आपली जागा पक्की केली. त्यानंतर संपूर्ण संघाचा धोनीने आपल्या घरी आलिशान अशा हॉलमध्ये पाहुणचार केला. संघातील खेळाडू आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी त्याच्या घरी भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच एक झकास ग्रुप फोटो देखील काढला.

दरम्यान बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत पहिले २ सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी रांचीमध्ये दाखल झाला. यावेळी विमानतळावर टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. आपल्या लाडक्या धोनीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांची विमानतळावर झुंबड उडाली होती.

धोनी आपल्या घरच्या मैदानावर हा सामना खेळणार असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. वन-डे विश्वचषकाआधी टीम इंडियाची ही अखेरची वन-डे मालिका असणार आहे, त्यामुळे या मालिकेत विजय मिळवून विश्वचषकात सकारात्मक मानसिकतेने जाण्याकडे भारतीय संघाचा कल असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 1:12 pm

Web Title: video of ms dhoni enjoying driving at hometown ranchi
Next Stories
1 UEFA : १३ वेळा जेतेपद मिळवणारा रियल माद्रिद ‘राउंड ऑफ १६’मध्येच स्पर्धेबाहेर
2 स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक जिंकू शकतो -वॉर्न
3 आता कशाला विश्वचषकाची बात?
Just Now!
X