जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटात अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा पराभव करत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. विनेशने आपल्या अमेरिकन प्रतिस्पर्ध्यावर दुसऱ्या रेपिचाज राऊंडमध्ये ८-२ असं वर्चस्व गाजवलं. आता विनेशला कांस्यपदकासाठी ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीशी सामना करायचा आहे.

पहिल्या रेपिचाज राऊंडमध्ये विनेशने युक्रेनच्या युलियावर ५-० ने मात केली होती. दुसरीकडे भारताच्या सीमा बिसलानेही पहिल्या फेऱ्यांमध्ये आश्वासक खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी सीमा दुसऱ्या फेरीत पराभूत झाली. याव्यतिरीक्त भारताची पुजा धांडाही या स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात आपलं ऑलिम्पिक स्थान पक्क करण्यासाठी उतरली आहे.