इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी-२० मालिकेमधील तिसरा सामना भारताने गमावला आहे. अहमाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी पार पडलेल्या सामन्यामध्ये इंग्लंडने आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत २-१ ने आघाडी घेतलीय. भारताचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय संघातील सलामीवीर. तिसऱ्या सामन्यामध्येही भारताचा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या सामन्याप्रमाणेच भोपळाही न फोडता तंबूत परतल्याने अनेकांनी राहुलला संघात स्थान देण्यासंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र असं असतानाही कर्णधार विराट कोहलीने राहुल हा चॅम्पियन खेळाडू असल्याचं सांगत तो पुढील सामन्यांमध्येही संघात असेल असं सूचक वक्तव्य तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना व्यक्त केलं आहे.

के. एल. राहुल या टी-२० मालिकेमधील तिन्ही सामन्यांमध्ये सालामीवीर म्हणून मैदानात उतरला. मात्र पहिल्या सामन्यात तो एक धाव करुन बाद झाला आणि त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये त्याला भोपळाही फोडता आला नाहीय. याच कामगिरीमुळे सोशल नेटवर्किंगवरही राहुलच्या नावाची चांगलीच चर्चा असून अनेकांनी राहुलऐवजी इतर खेळाडूंना संधी घ्यावी अशी मागणी केलीय. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीने राहुलची पाठराखण केली आहे.

“तो (राहुल) चॅम्पियन खेळाडू आहे. रोहितबरोबर तो आमचा महत्वाचा फलंदाज म्हणून खेळत राहणार आहे,” असं विराटने तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर घेतलेल्या कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं आहे. राहुलची पाठराखण करताना कोहलीने स्वत:चं उदाहरण दिलं आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यापर्यंत मी स्वत:सुद्धा वाईट फॉर्ममध्ये होते. दुसऱ्या सामन्यामध्ये विराटने नाबाद ७६ धावा केल्या तर तिसऱ्या सामन्यात नाबाद ७७ धावा करत त्याने भारताला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये विराटला कोणत्याच फलंदाजाने साथ न दिल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून जिंकला.

विराटने राहुलला चॅम्पियन खेळाडू म्हटलं असलं तरी नेटकऱ्यांनी के. एल. राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवसारख्या तरुणांना संधी देऊन पहावी असं मत व्यक्त केलं आहे. राहुलला अनेकांनी ट्रोल केलं आहे. आयपीएलमधील पंजाब संघाचा कर्णधार असलेल्या राहुलची मिम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतलीय.

झिरो चेक करा

पहिलं शतक

क्रिकेट चाहते

राहुल आणि मोदी स्टेडियम

राहुलला बाद होताना बघून

मैदानात आल्या आल्या

नाव बदल

दरम्यान, तिसऱ्या सामन्यामध्ये पराभव झाल्याने आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. या मालिकेतील चौथा सामना १८ मार्च रोजी तर अंतिम सामना २० मार्च रोजी होणार आहे.