भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली उद्या वयाच्या तिशीत पदार्पण करतो आहे. सध्या भारत विरुद्ध विंडीज टी-20 मालिकेतून विराटला विश्रांती देण्यात आलेली आहे. या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतरचा पहिला वाढदिवस विरुष्का जोडी बर्फवृष्टीमध्ये साजरा करणार असल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – विराट कोहली कसोटी क्रिकेट जिवंत ठेऊ शकतो – ग्रॅम स्मिथ

विराट आणि अनुष्का, ‘झिरो’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा सोहळा पार पडल्यानंतर तात्काळ उत्तराखंडला रवाना झाले. देहरादूनला आपल्या नियोजीत स्थळी पोहचल्यानंतर दोघांनीही आराम करणं पसंत केलं. अनुष्काच्या गुरुंचा हरिद्वार येथील अंबुवाला परिसरात आश्रम आहे, त्यामुळे विराट व अनुष्का जोडी आपल्या गुरुंनाही भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली आधुनिक जगाचे सर डॉन ब्रॅडमन !