पाचवेळा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ जगजेत्ता राहिलेल्या विश्वनाथन आनंदने लेवोन अरॉनैनचा पराभव करत ‘कॅन्डीडेट्स चेस’ स्पर्धेत विजयी सुरूवात केली आहे.
लेवोन आणि विश्वनाथनमध्ये चुरशीची लढत रंगली होती. परंतु, आपल्या चलाख खेळीने विश्वनाथनने लेवोनला मागे सारत विजय प्राप्त केला.
विश्वनाथनची खेळी पाहता स्पर्धेत त्याच्याकडून आणखी चांगली खेळी होण्याची अपेक्षा आहे.