News Flash

अक्रम, मियाँदाद पाकिस्तानचे प्रशिक्षक निवडणार

आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची आगामी आव्हाने लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीचे

| January 23, 2014 01:49 am

आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची आगामी आव्हाने लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक निवडण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) चारसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.
प्रशिक्षकपदाच्या समितीमध्ये माजी कर्णधार जावेद मियाँदाद आणि वसिम अक्रम यांचा समावेश आहे. या समितीत माजी कर्णधार इंतिखाब आलम यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुभान अहमद यांचीही निवड करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी असली तरी परदेशी उमेदवारांनी अर्ज करायचा की नाही, हे पीसीबीच्या जाहिरातीत नमूद करण्यात आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2014 1:49 am

Web Title: wasim akram javed miandad in panel to find new pakistan coach
Next Stories
1 अँडरसनने मारला षटकार, भारतीय लखपती झाला!
2 ऑस्ट्रेलियन ओपन- गतविजेत्या अझारेन्काला पराभवाचा धक्का
3 ऑस्ट्रेलियन ओपन: उपांत्यफेरीत फेडरर-नदाल आमने-सामने
Just Now!
X