News Flash

Video : पाहा वॉर्नरचा पत्नीसोबत धमाल टिकटॉक डान्स

नंतर पोस्ट केला रोमँटिक फोटो

करोनाचा फटका क्रीडा विश्वाला बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरी आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर त्यात आघाडीवर आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि मुंगूस बॅट… हेडनने सांगितला किस्सा

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करतानाचा त्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत त्याने लेकीसोबत ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स केला. दुसऱ्या वेळी वॉर्नरने त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर ‘साऊथ स्टार’ अल्लू अर्जूनच्या गाण्यावर ही श्री व सौ वॉर्नर थिरकताना दिसले. तर त्याच्या पुढच्या व्हिडीओत वॉर्नर चहाचा घोट घेत विचित्र हावभाव करताना दिसला. आता वॉर्नर एक नवा व्हिडीओ घेऊन आला आहे.

IPL : ‘या’ संघासाठी आम्ही दोन-दोन तास ‘प्लॅनिंग’ करतो – रोहित शर्मा

नव्या व्हिडीओमध्ये वॉर्नरने आपली पत्नी कँडी आणि मुलगी यांच्यासोबत विरासत या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या म्यूझीकवर डान्स केला आहे. त्याने त्या व्हिडीओमध्ये केवळ हातवाऱ्यांच्या सहाय्याने डान्स केला असून तिघांनीही एकत्रितपणे सारखे हावभाव केल्याने व्हिडीओत धमाल येत आहे. त्यानंतर वॉर्नरने पत्नीसोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

We are back again!! #challenge #family #boredinthehouse #isolation @candywarner1

A post shared by David Warner (@davidwarner31) on

वाचा महत्त्वाची बातमी – टी २० विश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान

पत्नीसोबत केला फोटो शेअर

 

View this post on Instagram

 

Love of my life #family #wife #punchingabove @candywarner1

A post shared by David Warner (@davidwarner31) on

दरम्यान, त्या आधीच्या व्हिडीओमध्ये वॉर्नरने टिक टॉकचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यात वॉर्नरच्या हातात चहाचा कप होता. चहा गरम असल्याने तो दोन हातांचा समतोल साधून चहाचा कप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसला. तसेच त्यानंतर तो चहाचा घोट पिऊन विचित्र हावभाव करतानाही दिसला. हे सारं वॉर्नर एका म्यूझीकच्या लयीवर करताना दिसला. असंच किंवा यापेक्षाही चांगल्या प्रकारे तू असं करू शकतोस का ते दाखव, असं आव्हानही त्याने सहकारी खेळाडू अरॉन फिंचला दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:50 pm

Web Title: watch david warner dance on bollywood music with wife candice and daughter tik tok video vjb 91
Next Stories
1 रोहित शर्मा म्हणतो, शिखर धवन वेडा माणूस आहे !
2 महेंद्रसिंग धोनी आणि मुंगूस बॅट… हेडनने सांगितला किस्सा
3 सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी २२ वर्षीय फुटबॉलपटूला अटक
Just Now!
X