आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फटकेबाजीसोबतच…धिप्पाड देहयष्टी आणि उंचीमुळे चर्चेत असलेला विंडीजचा खेळाडू रखिम कॉर्नवॉलने मैदानात पुन्हा एकदा आपली चपळाई सिद्ध केली आहे. कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत सेंट लुशिया विरुद्ध गयाना या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॉर्नवॉल स्लिपमध्ये फिल्डींगसाठी उभा होता. गयाना वॉरियर्सचा डाव सुरु असताना १४ व्या षटकात इम्रान ताहीरच्या बॅटची कड घेऊन चेंडू कॉर्नवॉलच्या दिशेने गेला.
परंतू हा चेंडू कॉर्नवॉलपासून थोडा दूर होता…तरीही कॉर्नवॉलने आपली चपळाई दाखवत बॉलच्या दिशेने झुकून एका हाताने सुरेख झेल घेतला. रखिमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Rahkeem Cornwall casually plucking a blinder at first slip
What a sight!pic.twitter.com/vSRGNNSDQ6
— Wisden (@WisdenCricket) September 9, 2020
सेंट लुशिया संघाने गयानाला उपांत्य फेरीच्या सामन्यात अवघ्या ५५ धावांत गुंडाळलं. CPL च्या इतिहासातली ही सर्वात दुसरी निच्चांकी धावसंख्या मानली जाते. यानंतर कॉर्नवॉलने फलंदाजीतही आपली चमक दाखवत १७ चेंडूत ३२ धावा केल्या. सेंट लुशिया संघाने १० गडी राखून हा सामना जिंकला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 1:32 pm