ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाच्या स्मिथची नकल केली. पहिल्या सत्रादरम्यान घेण्यात आलेल्या ब्रेकदरम्यान रोहित शर्मा स्टंपपुढे गेला अन् शॅडो फलंदाजी केली. रोहित शर्माला सान्यादरम्यान शॅडो फलंदाजी करताना पाहून स्मिथ आणि चाहतेही चकीत झाले.

हिटमॅन रोहित शर्मा स्टिव्ह स्मिथचा मजाक उडवण्यासाठी असं करत असल्याचेही काही चाहत्यांना वाटलं. तर सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी असं कृत्य करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. रोहित शर्माच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर स्मिथ आणि रोहित यांची चर्चा सुरु आहे. नेटकरी आपापली मतं व्यक्त करत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पंत फलंदाजी करताना स्मिथनं केलेल्या कृत्याची परतफेड असल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘सुंदर’ खेळीनं त्यानं कोट्यावधी चाहत्यांची मन जिंकली मात्र वडील म्हणतात…

समालोचन करणारे भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी रोहितचं हे कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, रोहितच्या या कृत्यामुळे फलंदाजाचे फुटमार्क पुसले जाण्याची शक्यता आहे. जर सिडनीमध्ये स्मिथ चुकीचा होता तर आता रोहित शर्माही चुकीचा आहे. रोहितच्या या कृत्यावर स्मिथनेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाहा व्हिडीओ –

एक नंबर! असा षटकार तुम्ही कधी पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

चौथ्या कसोटीतील पहिल्या सत्रात घेतलेल्या एका ब्रेकदरम्यान रोहित शर्मा शॅडो प्रॅक्टिस करताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. रोहित शर्मा शॅडो प्रॅक्टिस करत असताना स्मिथची अवाक होत त्याच्याकडे पाहात होता. रोहितच्या या कृत्यानं चाहत्यांना सिडनी कसोटीतील स्मिथच्या त्या कृत्याची आठवण करुण दिली. सिडनी कसोटीत स्मिथनं शॅडो प्रॅक्टिस करताना पंतचं बॅटिंग गार्ड पुसल्याचा आरोप लावला होता. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि कोच यांनी याचं खंडण केलं होतं.