आशियाई देशांमध्ये अ‍ॅथलेटिक्सकरिता विपुल प्रमाणावर क्रीडानैपुण्य आहे. या नैपुण्याच्या विकासाकरिता महासंघातर्फे नवीन योजना आखण्यात येणार आहेत, असे अल हमाद यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘युरोपियन व अमेरिकन देशांमध्ये अ‍ॅथलेटिक्सचे जोरदार मार्केटिंग केले जाते. आशियाई देशांमध्येही अनेक अव्वल दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, मात्र त्याच्या प्रसिद्धीत आपण कमी पडतो. हे लक्षात घेऊनच आम्ही विविध स्पर्धाच्या मार्केटिंगवर भर देणार आहोत. चीन, जपान, दक्षिण कोरिया आदी देशांमध्ये अतिशय श्रेष्ठ प्रशिक्षक आहेत. त्या प्रशिक्षकांची मदत खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाईल.’’