News Flash

Wimbledon 2018 :  मुगुरुझा, डेलपोत्रो यांची शानदार सलामी

जुआन मार्टिन डेलपोत्रो व गर्बिन मुगुरुझा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार सलामी केली

| July 4, 2018 01:43 am

गर्बिन मुगुरुझा , जुआन  डेलपोत्रो

विम्बल्डन  टेनिस स्पर्धा

विम्बल्डन : माजी विजेता रॅफेल नदाल तसेच अजिंक्यपद मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जुआन मार्टिन डेलपोत्रो व गर्बिन मुगुरुझा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार सलामी केली. मात्र शुई पेंग व अनास्ताशिया पावलीचेन्को यांना पराभवास सामोरे जावे लागले.

एकतर्फी लढतीत नदालने डुडी सेलाचा ६-३, ६-३, ६-२ असा धुव्वा उडविला. डेलपोत्रोने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत पीटर गोझोविकवर ६-३, ६-४, ६-३ अशी सरळ सेट्समध्ये मात केली. केई निशिकोरीला ख्रिस्तियन हॅरीसनवर ६-२, ४-६, ७-६ (७-४), ६-२ असा विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. फेलिसिया लोपेझने फेड्रिको डेल्वोनिसचे आव्हान ६-३, ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले.

महिलांमध्ये मुगुरुझाने नाओमी ब्रॅडीवर ६-२, ७-५ असा विजय मिळविताना परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला. समंथा स्टोसूरने शुई पेंगला ६-४, ७-५ असे हरवले. चीन तैपेईच्या सुवेई हिसेहने पावलीचेन्कोला ६-४, ४-६, ६-३ असा पराभवाचा धक्का दिला. अ‍ॅशलीघ बार्टीने स्टीफनी व्होगोलीवर ७-५, ६-३ अशी मात केली. अँजेलिक कर्बरने व्हेरा जोवोनारेवाला ७-५, ६-३ असे पराभूत केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 1:43 am

Web Title: wimbledon 2018 del potro and garbine muguruza make winning starts to wimbledon
Next Stories
1 भारताच्या विजयात कुलदीप-लोकेश राहुल चमकले, मालिकेत १-० ने आघाडी
2 या आहेत टी२० क्रिकेटमधील TOP 5 वैयक्तिक धावसंख्या…
3 बोगस डिग्रीमुळे हरमनप्रीतची ‘विकेट’?
Just Now!
X