Women’s T20 World Cup : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत ३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. शफालीची (४६) धडाकेबाज खेळी आणि तिला तानियाने (२३) दिलेली साथ याच्या बळावर भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचे प्रयत्न ३ धावांनी तोकडे पडले. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

१३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट १२ धावा करून माघारी परतली. पाठोपाठ अनुभवी सुझी बेट्सदेखील त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली. कर्णधार सोफी डिव्हाईनही १४ धावा करून बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ झाली होती. त्यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टीन यांनी डाव सावरला. या दोघींनी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर राजश्री गायकवाडने जमलेली जोडी फोडली. फलंदाज मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. लगेच केटी मार्टीनही २५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर अमेलिया किर हिने तुफान फटकेबाजी केली. तिने ६ चौकार लगावत १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. पण एका चेंडूत ५ धावा हव्या असताना अखेर न्यूझीलंडला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. संघात पुनरागमन करणारी स्मृती मानधना ११ धावांवर त्रिफळाचीत झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर जेमिमा ८ चेंडूत १० धावा करून माघारी परतली. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतही केवळ १ धाव करून ती बाद झाली. धडाकेबाज खेळी करणारी सलामीवीर शफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तिने ४६ धावा केली.

अनुभवी वेदा कृष्णमूर्ती फटका खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. पंचांनी तिला बाद ठरवले नाही, त्यामुळे न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला. त्यात तिला पायचीत घोषित करण्यात आले. ११ चेंडूत ८ धावा करणारी दिप्ती शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली आणि भारताला सातवा धक्का बसला. त्यानंतर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला १३३ धावांचा टप्पा गाठून दिला.

Live Blog

13:29 (IST)27 Feb 2020
भारत उपांत्य फेरीत!

अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय

12:12 (IST)27 Feb 2020
मार्टीन २५ धावांवर बाद, भारत भक्कम स्थितीत

चांगली खेळी करणारी केट  मार्टीन २८ चेंडूत २५ धावा काढून बाद झाली. त्यामुळे भारताने शंभरीच्या आत न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी धाडला.

12:01 (IST)27 Feb 2020
राजेश्वरीने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी

संयमी खेळी करत डाव पुढे नेणारी मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. राजेश्वरीने न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली आणि चौथा धक्का दिला.

11:57 (IST)27 Feb 2020
कर्णधार डिव्हाईन माघारी, न्यूझीलंडला तिसरा धक्का

पहिल्या दोन सामन्यात दमदार खेळी करणारी कर्णधार सोफी डिव्हाईन १४ धावांत माघारी परतली.

11:29 (IST)27 Feb 2020
अनुभवी सुझी बेट्स त्रिफळाचीत; न्यूझीलंडला दुसरा धक्का

अनुभवी सुझी बेट्स त्रिफळाचीत; न्यूझीलंडला दुसरा धक्का

11:17 (IST)27 Feb 2020
न्यूझीलंडला पहिला धक्का; प्रिस्ट स्वस्तात तंबूत

न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट हिने २ चौकार लगावत फटकेबाज सुरूवात केली होती, पण १२ धावा करून प्रिस्ट माघारी परतली आणि न्यूझीलंडला  पहिला धक्का बसला.

10:53 (IST)27 Feb 2020
शफालीची धडाकेबाज खेळी; न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान

सलामीवीर शफालीची धडाकेबाज ४६ धावांची खेळी आणि तिला तानिया भाटीयाने (२३) दिलेली साथ याच्या बळावर भारताने २० षटकात ८ बाद १३३ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले.

10:43 (IST)27 Feb 2020
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिप्ती शर्मा बाद

११ चेंडूत ८ धावा करणारी दिप्ती शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली आणि भारताला सातवा धक्का बसला.

10:39 (IST)27 Feb 2020
वेदा कृष्णमूर्ती पायचीत; भारताचे ६ गडी माघारी

अनुभवी वेदा कृष्णमूर्ती फटका खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. पंचांनी तिला बाद ठरवले नाही, त्यामुळे न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला. त्यात तिला पायचीत घोषित करण्यात आले.

10:29 (IST)27 Feb 2020
शफालीचं अर्धशतक हुकलं; भारताला पाचवा धक्का

धडाकेबाज खेळी करणारी सलामीवीर शफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली.

10:24 (IST)27 Feb 2020
कर्णधार हरमनप्रीत बाद; भारताला चौथा धक्का

गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतला या सामन्यातही सूर गवसला नाही. केवळ १ धाव करून ती बाद झाली.

10:16 (IST)27 Feb 2020
मुंबईकर जेमिमा माघारी; भारताला तिसरा धक्का

धावगती वाढवण्यासाठी खेळपट्टीवर येताच मुंबईकर जेमिमाने फटकेबाजी सुरू केली पण ८ चेंडूत १० धावा करून ती माघारी परतली.

10:10 (IST)27 Feb 2020
तानिया झेलबाद; भारताला दुसरा धक्का

यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या.

09:59 (IST)27 Feb 2020
शफाली-तानियाची फटकेबाजी; सातव्या षटकात अर्धशतकी मजल

स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली.

09:46 (IST)27 Feb 2020
स्मृती मानधना त्रिफळाचीत, भारताला पहिला धक्का

फटकेबाज सुरूवात करणारी स्मृती मानधना बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून त्रिफळाचीत झाली आणि भारताला पहिला धक्का बसला. तिने ८ चेंडूत ११ धावा केल्या.

09:32 (IST)27 Feb 2020
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम गोलंदाजी

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.