क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आता अवघे काही दिवस शिलकी आहेत. या स्पर्धेसाठी सारेच संघ करत आहेत. संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे, यात दुमत नाही. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान अनुभवी गोलंदाज डेल स्टेन याने संघासाठी विश्वचषक जिंकवून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा चोकर्स असा लौकिक आहे. बहुतांश मोठ्या स्पर्धांमध्ये साखळी फेरीतील सामने मोठ्या फरकाने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला बाद फेरीत मात्र नेहमी पराभव पत्करावा लागला आहे, त्यांजले त्यांचे चोकर्स असे नाव पडले आहे. पण ‘क्रिकेटपमधून निवृत्त होण्याआधी मला माझ्या संघाला विश्वचषकाची ट्रॉफी मिळवून द्यायची आहे, असा निर्धार व्यक्त केला आहे.

द. आफ्रिका क्रिकेट संघ (संग्रहित)

 

”या विश्वचषक स्पर्धेत खेळताना मी माझे सर्वस्व पणाला लावून खेळेन. माझ्या घरात अनेक महत्वाच्या ट्रॉफी आहेत, पण विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी नाही. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय किर्केटमधून निवृत्त होण्याआधी मला माझ्यात संघाला विश्वविजेता करायचे आहे. आमच्या संघात चांगले फलंदाज आहेत. ३ ते ४ अष्टपैलू खेळाडू आहेत. तुम्ही संघ पाहिलात तर तुम्हाला एक बाब नक्कीच लक्षात येईल की हे खेळाडू सर्वोत्तम नसले तरी प्रतिभावान आहेत. विश्वचषक स्पर्धेचे वातावरणच खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे विश्वचषकातील आफ्रिकेचा भूतकाळ विसरुन खेळाडू खेळले तर त्याचा नक्कीच स्पर्धेत फायदा होईल”, असेही स्टेनने सांगितले.

डेल स्टेन IPL च्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात बंगळुरू संघाचा भाग होता. पण त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला फार सामने खेळणे शक्य झाले नाही. त्याने बंगळुरूकडून २ सामने खेळले. त्यात त्याची कामगिरी चांगली झाली. पण २ सामन्यानंतर तो विश्वचषकाच्या तयारीसाठी आफ्रिकेला परतला.