News Flash

“तुझ्याकडे बघू की कॅमेराकडे?”; WTC Final विशेष मुलाखतीत बुमराहने मुलाखत घेणाऱ्या पत्नीलाच विचारला प्रश्न

चाहत्यांना बुमराहची ही मुलाखत फारच आवडली असून ते कमेंटवरुन दिसून येत आहे. संजनासोबत लग्न ठरलं त्यावेळेसही बुमराहची मुलाखत घेतानाचा संजनाचा जुना फोटो व्हायरल झालेला

Sanjana Ganesan interview Jasprit Bumrah
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्याआधी घेण्यात आली ही विशेष मुलाखत. (फोटो : TWITTER/ICC वरुन साभार)

भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. साऊथहॅम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात कसोटी क्रिकेटमधील हे दोन्ही दिग्गज संघ सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी आमने-सामने उभे ठाकतील. भारताने या चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत १७ सामने खेळे असून १२ सामने जिंकले आहेत. या कालावधीमध्ये भारताने केवळ एक मालिका गमावलीय. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. भारताचे गुणतालिकेमध्ये ५२० गुण आहेत तर विजयाची सरासरी ७२.२ इतकी आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने सात सामने जिंकलेत तर चारमध्ये त्यांचा पराभव झालाय. त्यांचे एकूण ४२० गुण असून विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. याच कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहचले असून अंतिम सामन्यासाठी आयसीसीने कोणतीही कसर सोडलेली नाही.

नक्की वाचा >> WTC Final: भारत-न्यूझीलंडदरम्यानचा सामना भारतात कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

सामना निकाला लागावा म्हणून अगदी एक अतिरिक्त दिवसही वेळापत्रकात ठेवण्यात आलाय. त्यानंतरही सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना विजेतेपद वाटून दिलं जाईल. दोन्ही संघाची पूर्ण तयारी झाली असून हीच जाणून घेण्यासाठी दोन्ही संघातील काही खेळाडूंच्या मुलाखती सामन्याच्या काही दिवस आधी घेण्यात आला. यामध्ये भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश आहे. बुमराहची मुलाखत मात्र सर्वात खास ठरली कारण त्याची मुलाखत त्याच्या पत्नीनेच घेतली.

नक्की पाहा >> Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण

बुमराहने संजना गणेशनला मुलाखत दिली. स्पोर्ट्स प्रेझेंटर असलेल्या संजनाचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच संजनाने बुमराहची मुलाखत घेतली. मुलाखत घेण्यासाठी आपली पत्नीच उपस्थित असेल याची बुमराहला कल्पना नव्हती. मात्र संजनाच मुलाखत घेणार असल्याचं समजल्यानंतर बुमराहच्या चेहऱ्यावरील हसू पाहण्यासारखं होतं. तो मुलाखतीमध्येही अनेकदा लाजून हसत असल्याचं पाहयला मिळालं. संजनाने बुमराहचं स्वागत केलं तेव्हा त्याने तिला तुला पाहून आनंद झाला असं म्हणत तुला याआधी मी कुठेतरी पाहिल्याचं सांगितलं. यावर संजनानेही, ”मी इथेच आजूबाजूला आहे”, असं म्हटलं.

नक्की वाचा >> India vs Sri Lanka Series: क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

कसं वाटतंय असा पहिलाच प्रश्न संजनाने विचारल्यानंतर बुमराहने, तुला माहितीय की मला कसं वाटतंय असं मजेदार उत्तर दिलं. त्यानंतर संजनाने बुमराहला प्रश्न काय असतील याची कल्पना दिली. त्यानंतर बुमराह तिला मस्करीमध्ये मी कॅमेराकडे बघायचं आहे की तुझ्याकडे?, असा प्रश्न विचारतो. यावर संजनाने त्याला कॅमेराकडे पाहण्यास सांगितलं. संजनाच्या उत्तरानंतर बुमराहने प्रयत्न करतो अशी मजेदार प्रतिक्रिया दिली. त्यानंतर दोघेही मोठ्याने हसू लागले. मुलाखतीदरम्यान अनेकदा बुमराह लाजत हसत असल्याचं दिसले. मुलाखतीमध्ये बुमराह इन्स्ताग्रामवर त्याने शेअर केलेल्या वेगवेगळ्या फोटोंचे किस्से सांगतो.

नक्की वाचा >> ‘त्याने’ ५४ चेंडूंमध्ये ९६ धावा करत मिळवून दिला संघाला विजय; आंतरराष्ट्रीय कारकीर्द मात्र संपल्यात जमा

चाहत्यांना बुमराहची ही मुलाखत फारच आवडली असून ते कमेंटवरुन दिसून येत आहे. संजनासोबत लग्न ठरलं त्यावेळेसही बुमराहची मुलाखत घेतानाचा संजनाचा एक जुना फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 11:25 am

Web Title: wtc final wife sanjana ganesan takes jasprit bumrah interview scsg 91
Next Stories
1 WTC Final: भारत-न्यूझीलंडदरम्यानचा सामना भारतात कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
2 Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण
3 World Test Championship: टॉस जिंकल्यास भारताने काय निर्णय घ्यावा; सौरभ गांगुलीने दिला सल्ला
Just Now!
X