३० मे पासून इंग्लंडमध्ये, आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. या स्पर्धेसाठी दहाही संघांनी आपल्या १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. सध्या आयपीएलचा हंगाम सुरु असला तरीही चाहत्यांमध्ये आता विश्वचषकात कोण बाजी मारणार याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. न्यूझीलंडच्या संघाने सर्वात प्रथम आपल्या शिलेदारांची घोषणा केली, तर विंडीजच्या संघाने बुधवारी सर्वात शेवटी आपला संघ जाहीर केला.

भारतानेही आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दिनेश कार्तिक आणि विजय शंकरला संघात स्थान देत निवड समितीने गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. सर्व संघांमध्ये कोणता संघ बलाढ्य आहे यावरुनही सध्या चर्चांना उधाण आलंय. आतापर्यंत जाहीर झालेल्या संघावर तुम्हीच एकदा नजर टाका आणि ठरवा कोणता संघ हा बलाढ्य आहे.

दरम्यान भारताचा विश्वचषकात पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.