Aakash Chopra’s statement on Shivam Dube : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला हा त्याच्या आयपीएल २०२४ मधील शानदार कामगिरीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आता त्याची टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड केली जावी, ही मागणी जोर धरत आहे. कारण शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जसाठी १७२.४१ च्या उल्लेखनीय स्ट्राइक रेटने नऊ डावांमध्ये ३५० धावांच्या प्रभावी खेळीने चाहत्यांसह आजी-माजी दिग्गज खेळाडूंना प्रभावित केले आहे. त्यामुळे कोणताही कर्णधार किंवा निवडकर्ता त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे माजी खेळाडू आकाश चोप्राचे मत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने दुबेला आपला खंबीर पाठिंबा व्यक्त केला. त्याने शिवम दुबेला केवळ १५ सदस्सीय संघात नव्हे, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी दिली जावी, अशा मागणी केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “हा मुलगा ज्या प्रकारे खेळत आहे, ते शानदार आणि खळबळजनक आहे. त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही त्याला फक्त १५ सदस्सीय संघात पाठवू नका, तर त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील समावेश करा.”

Kohli Fervent fans rally behind Kohli with spirited chants video viral
VIDEO : ‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’, लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांनी दिल्या घोषणा, विराट पुन्हा होणार कर्णधार?
Shahid Afridi opens up on IPL's influence on cricket's transformation
T20 WC 2024 : ‘क्रिकेट आता एक व्यवसाय झालाय…’, आयपीएलबद्दल माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
Sanjay Manjrekar vote for Hardik Pandya
T20 WC 2024 : “हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज असू शकत नाही, कारण…”, संजय मांजरेकरने रोहितच्या टीमला दिला इशारा
all eyes on the performance of the indian team in icc t20 world cup
विश्वचषकात अमेरिकेच्या पदार्पणाची उत्सुकता; ‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे भारताचे ध्येय
jitesh sharma s opinion on impact player rule
क्रिकेटची खरी मजा ११ खेळाडूंनी खेळण्यातच!; ‘प्रभावी खेळाडू’च्या नियमाबाबत भारताचा यष्टिरक्षकफलंदाज जितेश शर्माचे मत
bring rohit sharma hardik pandya together
रोहित – हार्दिकला एकत्र आणणे महत्त्वाचे ; ट्वेन्टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंगचे मत
Rinku Singh Statement on IPL Salary
IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला

शिवम दुबेकडे कोणीही दुर्लक्ष करु शकत नाही –

शिवम दुबेच्या फलंदाजीबद्दल बोलताना माजी दिग्गज आकाश चोप्रा म्हणाला, “कोणताही कर्णधार, संघ व्यवस्थापन किंवा निवडकर्ता त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण या क्षणी भारतामध्ये त्याच्यापेक्षा चांगला फटकेबाजी करु शकणारा खेळाडू नाही. त्यामुळे जर तुम्ही त्याला बाकावर बसवले, तर हा घोर अन्याय होईल.” त्याबरोबर या वर्षीच्या आयपीएलमध्ये दुबेच्या क्रिकेटपटूच्या विकासाचे विश्लेषण करताना, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने अष्टपैलू खेळाडूने त्याच्या कमकुवतपणावर मात करताना केलेल्या उल्लेखनीय सुधारणांवर प्रकाश टाकला.

हेही वाचा – IPL 2024 : गौतम गंभीरचे विराटबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, मला कोहलीकडून ‘ही’ गोष्ट शिकायला आवडेल

“प्रत्येक फलंदाजाची एक कमकुवतता असते” –

मोहम्मद कैफ स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात म्हणाला, “प्रत्येक फलंदाजाची एक कमकुवतता असते. त्याची कमकुवतता बाउंसर्सच्या विरोधात होती किंवा तुम्ही त्याला रुंद रेषेवर गोलंदाजी करून अडकवू शकत होता. मात्र, आता त्याने यामध्ये सुधारणा केल्याने मजबूत झाला आहे. आता तो एक्स्ट्रा कव्हरवर पुल आणि षटकार मारत आहे. अशा प्रकारे तो मैदानाच्या प्रत्येक भागात फटकेबाजी करुन अप्रतिम खेळी खेळत आहे.”

हेही वाचा – PHOTO : … म्हणून साक्षी धोनीने चेन्नईला केली होती मॅच लवकर संपवण्याची विनंती, म्हणाली, “बेबी आनेवाला है…”

मोहम्मद कैफने दुबेच्या अष्टपैलुत्वाची आणि पॉवर हिटिंग कौशल्याची प्रशंसा केली. त्याचबोबर मैदानाच्या सर्व भागात सहजतेने चेंडू पाठवण्याच्या क्षमतेचे पण कौतुक केले. कैफ पुढे म्हणाला, “तो स्लो फुल टॉसवरही षटकार मारतो. असे करणे खूप अवघड असते. कारण काही वेळा स्लो फुल टॉसवरही फलंदाज बाद होतात, पण त्याच्याकडे ताकद आहे. तो लांब हँडलचा योग्य वापर करतो आणि जास्त पाय न हलवता एका जागेवर उभारुनच मोठा फटका मारतो. त्यामुळे जेव्हा भारत विश्वचषक खेळायला जातो, तेव्हा तुम्हाला अशाच खेळाडूची गरज असते.”