आशियाई बॉक्सिंग स्पर्धा
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या तीन युवा बॉक्सर स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगने ४९ किलो वजनीगटात, शिवा थापाने ५६ किलो वजनी गटात आणि मनदीप जांग्राने ६९ किलो वजनीगटात तडफदार खेळीकरत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंचे रौप्य पदक पक्के झाले आहे आणि तिन्ही खेळाडू सुवर्णपदाचे मानकरी ठरतील अशी आशा रसिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आशियाई स्पर्धेच्या माध्यामातून देवेंद्रो सिंगने त्याच्या बॉक्सिंग करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. अवघ्या २१ वर्षीय देवेंद्रोने स्पर्धेत सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी केली आणि विजय प्राप्त करत अंतिम फेरी गाठली आहे. देवेंद्रोची आशियाई स्पर्धेतील कामगिरी वाखाडण्याजोगी आहे
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2013 रोजी प्रकाशित
भारताचे बॉक्सिंग त्रिरत्न अंतिम फेरीत दाखल
आशियाई बॉक्सिंग स्पर्धा आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या तीन युवा बॉक्सर स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगने ४९ किलो वजनीगटात, शिवा थापाने ५६ किलो वजनी गटात

First published on: 08-07-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 indians in asian boxing championships finals