हेडनचा शास्त्रींना टोला
शंभर कसोटी खेळल्यानंतर क्रिकेटच्या भल्याचे काय आहे, याविषयी मला बोलण्याचा अधिकार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने व्यक्त केले. नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी रवी शास्त्री यांनी टीकाकारांचा समाचार घेतला होता. मात्र ही खेळपट्टी क्रिकेटचे नुकसान करणारी आहे, असे ठाम मत हेडनने व्यक्त केले. मी शंभर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. क्रिकेटच्या भल्याविषयी बोलण्यासाठी एवढा अनुभव पुरेसा आहे, असे त्याने पुढे सांगितले.
‘‘८० टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींची प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या देशातील खेळपट्टय़ा बघा आणि त्याची चिंता करा अशीच आहे. पण खेळापोटी असलेल्या प्रेमातून माझी भूमिका मांडली. विभिन्न स्वरूपाच्या खेळपट्टय़ा असणार, त्यांच्याशी जुळवून घेणे हेच कौशल्य आहे,’’ असे हेडनने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2015 रोजी प्रकाशित
शंभर कसोटी खेळल्यानंतर क्रिकेटविषयी बोलण्याचा अधिकार
क्रिकेटच्या भल्याविषयी बोलण्यासाठी एवढा अनुभव पुरेसा आहेअसे मत मॅथ्यू हेडनने व्यक्त केले.
Written by झियाऊद्दीन सय्यद
Updated:
First published on: 03-12-2015 at 00:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After a playing 100 test cricket match than you have right to talk haddin