एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा अचानक निर्णय जाहीर करत सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का दिला. या निर्णयानंतर सचिन याबद्दल आपला विचार मांडेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण सचिनने मात्र कुटुंबीयांसह मसुरीला जाऊन सुट्टीचा आनंद अनुभवण्याचे ठरवले आहे.
निवृतीचा निर्णय घेतल्यानंतर सचिन रविवारी संध्याकाळी मसुरीच्या जॉलीग्राण्ट विमानतळावर उतरला तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी सचिनसह त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा, असा परिवार होता. या वेळी कॉँग्रेसच्या खासदार प्रिया दत्तही सचिनच्या कुटुंबासमवेत होत्या.
सचिन मसुरीमध्ये त्याचा मित्र संजय नारंग याच्या ‘रग्बी’ या हॉटेलामध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचला. यापूर्वी व्यस्त कार्यक्रमांमुळे सचिनला कुटुंबाला जास्त वेळ देता आला नव्हता, या वेळी मसुरीमध्ये कुटुंबासमवेत नाताळ आणि नववर्षांचा आनंद लुटण्याचा सचिनचा मानस आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
निवृत्तीनंतर सचिन कुटुंबीयांसमवेत सुट्टीवर
निवृतीचा निर्णय घेतल्यानंतर सचिन रविवारी संध्याकाळी मसुरीच्या जॉलीग्राण्ट विमानतळावर उतरला तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी सचिनसह त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा, असा परिवार होता. या वेळी कॉँग्रेसच्या खासदार प्रिया दत्तही सचिनच्या कुटुंबासमवेत होत्या.

First published on: 24-12-2012 at 07:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After retirement sachin on holiday