scorecardresearch

Premium

Ajay Jadeja: अजय जडेजाने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्याबाबत केले सूचक विधान; म्हणाला,“मी तयार…”

Ajay Jadeja on Pakistan Team: भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होण्याच्या प्रश्नावर सूचक विधान केले आहे. त्याच्या वक्तव्याची सोशल मीडियात बरीच चर्चा होत आहे.

I am ready Ajay Jadeja said about becoming the coach of Pakistan compared PAK team with Afghanistan
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होण्याच्या प्रश्नावर सूचक विधान केले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Ajay Jadeja on Pakistan Team: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये चांगलाच गोंधळ सुरू आहे. जिथे टीम डायरेक्टर मिकी आर्थरसह सर्व प्रशिक्षकांना हटवण्यात आले. त्याचवेळी मुख्य निवडकर्ताही बदलण्यात आला. पाकिस्तानच्या सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद हाफिज संघ संचालक तसेच, मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. दुसरीकडे, वहाब रियाझला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे.

विश्वचषकात घरचे प्रशिक्षक असल्याचा फायदा टीम इंडियाला मिळाला. अशा स्थितीत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही संघाचा प्रशिक्षक आपल्या देशाचा असावा असा आग्रह धरला आहे. ज्याच्याशी पाकिस्तानी खेळाडू चांगल्या पद्धतीने बोलू शकतात, ज्यांच्याशी संवाद चांगला आहे, असा व्यक्ती संघाचा प्रशिक्षक व्हावा अशी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची देखील इच्छा आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाच्या एका वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Hanuma Vihari Leaving AP Cricket Association Politics Leaving Captaincy
Hanuma Vihari : खळबळजनक! भारतीय क्रिकेटपटूला नेत्याच्या मुलावर ओरडणं पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा
Sarfaraz Khan's fans angry with Virender Sehwag's pos
IND vs ENG : जुरेलच्या शानदार खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने मीडियाकडे ‘ही’ मागणी केल्याने सर्फराझचे चाहते संतापले
Shahrukh Khan Qatar PM
“मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा
indian navy officers qatar
कतारने ज्या भारतीयांना सुनावली होती फाशीची शिक्षा, त्यांचीच केली सुटका; नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा: BAN vs NZ: किवींनी घेतला मॅथ्यूजचा बदला! ना कॅच, ना एलबीडब्ल्यू; विचित्र पद्धतीने बाद झाला ‘हा’ बांगलादेशी फलंदाज

अजय जडेजा पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्यास तयार आहे

एका स्पोर्ट्स चॅनलशी झालेल्या संवादादरम्यान, जेव्हा त्याला विचारण्यात आले की, “तुम्हाला पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल का?” यावर माजी भारतीय खेळाडू अजय जडेजा म्हणाला, “मी तयार आहे.” आता जडेजा हे गंमतीने म्हणाला की, तो काहीतरी संकेत देत आहे, हे फक्त जडेजालाच माहित आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात जडेजाने अफगाणिस्तान संघाच्या मेंटॉरची भूमिका बजावली होती. संघ कर्मचारी म्हणून ही त्याची पहिली नियुक्ती होती. जडेजाच्या देखरेखीखाली अफगाणिस्तानने शानदार खेळ केला आणि चार सामने जिंकले, जे या संघाने एकाच विश्वचषकात सर्वाधिक जिंकले होते. अफगाणिस्तानने या विश्वचषक २०२३मध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

१९९६च्या विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत जडेजाने महत्त्वाची खेळी खेळली होती

अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या विश्वचषक विजेत्या संघांचा पराभव केला होता. अफगाणिस्तानच्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवात जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे पाहून चाहत्यांना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर १९९६च्या विश्वचषकातील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आठवला. त्या सामन्यात नवज्योत सिंग सिंधू, व्यंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळे यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. व्यंकटेशने आमिर सोहेलला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले हे कोण विसरू शकेल. मात्र, या सामन्याचा खरा हिरो होता अजय जडेजा. त्याने २५ चेंडूत ४५ धावांची तुफानी खेळी केली. आता तो पाकिस्तानचा प्रशिक्षक बनण्यास तयार असल्याच्या त्याच्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

हेही वाचा: Travis vs Sehwag: “काय मूर्खासारखे प्रश्न…”, ट्रॅविस हेडची वीरेंद्र सेहवागशी तुलना केल्याने अजय जडेजा संतापला

जडेजाने पाकिस्तानची तुलना अफगाणिस्तानशी केली

जडेजा म्हणाला, “मी माझा सर्व अनुभव अफगाणिस्तानशी शेअर केला. माझा असा विश्वास आहे की, पाकिस्तान एकेकाळी अफगाणिस्तानसारखा झाला असावा. अफगाणिस्तानने भारतातील विश्वचषक स्पर्धेत नऊ सामन्यांत चार विजय नोंदवले आणि गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले. त्याच वेळी, पाकिस्तान विश्वचषक २०२३ गुणतालिकेत अफगाणिस्तानपेक्षा वरचढ राहण्यात यशस्वी झाला. मात्र, बाबर आझम आणि त्यांचा संघ आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही. साखळी फेरीत संघ आठ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.” आता आगामी काळात खरच तो पाकिस्तानच्या प्रशिक्षक होणार की, ही सर्व इथेच थांबणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajay jadeja is ready to become the coach of pakistan cricket team his career was ruined in match fixing avw

First published on: 06-12-2023 at 16:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×