करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजन समितीने खेळाडूंसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या तत्त्वांनुसार, खेळाडू खेळगावात काय करू शकतात आणि काय नाही, हे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेसह या स्पर्धा पाहण्यासाठी अनुमती मिळाली आहे.

यासह, पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय १६ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल. यावेळी ऑलिम्पिक समितीने स्टेडियममध्ये जास्तीत जास्त १०,००० प्रेक्षकांना परवानगी देण्याचे स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती नाही अशा क्षेत्रांना ही परवानगी देण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान २० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड ठरणार ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑलिम्पिक समितीनेही नव्या नियमांनुसार खेळाडूंना कंडोम वाटण्यास नकार दिला आहे. पण, जपानची वृत्तसंस्था क्योडोनुसार, मायदेशी परतताना खेळाडूंना हे कंडोम मिळणार आहेत. तथापि, खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हे सर्व नियम अवलंबत असल्याचे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले आहे.

ऑलिम्पिक आणि कंडोमची परंपरा

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.