भारताचा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेता लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत त्याने माजी चॅम्पियन ली जी जिया विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात आपली सर्वोत्तम कामगिरी केली. बर्मिंगहॅम येथील युनायटेड एरिना येथे शुक्रवारी एक तास १० मिनिटे रंगलेल्या लढतीत लक्ष्यने १०व्या मानांकित मलेशियाच्या खेळाडूचा २०-२२,२१-१६,२१-१९ असा पराभव केला.

लक्ष्य सेनने २०२२ मध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर कारकिर्दीत दुसऱ्यांदा बर्मिंगहॅम येथील प्रतिष्ठीत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत १८व्या क्रमांकाच्या खेळाडूची या स्पर्धेतील ही सलग दुसरी उपांत्य फेरी आहे. या वर्षाच्या अखेरीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी तो आपली सर्वात्तम कामगिरी करत आहे.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

लक्ष्यने ली विरुद्ध अप्रतिम कामगिरी करून २३ वर्षांत प्रथमच ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियन बनण्याच्या भारताच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत. यापूर्वी फक्त प्रकाश पदुकोण (१९८१) आणि पुलेला गोपीचंद (२००१) यांनी देशासाठी ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. लक्ष्यने यावेळेस विजय मिळवला तर ही कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरेल. २०२१ मधील ऑल इंग्लंड चॅम्पियन ली जी जियाविरूध्द लक्ष्य सेनचा गेल्या ५ सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. ली नवीन हंगामात सातत्य ठेवत लय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पण लक्ष्यसाठीही हा विजय काही सोपा नव्हता, लीने सुध्दा उत्कृष्ट खेळ दाखवला.

ऑल इंग्लंड ओपनच्या शर्यतीत लक्ष्य सेन हा एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी दुसऱ्या फेरीत बाहेर पडली. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला गुरुवारी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित खेळाडू ॲन से यंगकडून पराभव पत्करावा लागला.