झुरिच बुद्धिबळ स्पर्धा : गेल्फंडने आनंदला पुन्हा बरोबरीत रोखले

विजयापासून वंचित राहिलेल्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद या भारतीय ग्रँडमास्टरला झुरिच बुद्धिबळ स्पर्धेत बोरिस गेल्फंडविरुद्ध पुन्हा बरोबरी स्वीकारावी लागली. या दोन खेळाडूंमधील पहिला डावही बरोबरीत राहिला होता.

या स्पर्धेतील आतापर्यंतच्या पाच डावांमध्ये आनंदला एकही डाव जिंकता आलेला नाही. अगोदरच्या फेरीत त्याला फॅबिआनो कारुआनाकडून पराभवाचा धक्का बसला होता. कारुआना याने रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक याला बरोबरीत रोखले व आघाडी कायम राखली. चार खेळाडूंच्या या स्पर्धेत कारुआना याचे तीन गुण झाले आहेत. गेल्फंड व क्रामनिक यांचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत तर आनंदचे दीड गुण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anand draws with gelfand stays last in zurich chess