भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारपासून मालिकेला सुरुवात होत आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला अमेरिकेपासून सुरुवात होईल. मात्र या मालिकेला सुरुवात होण्याआधीच वेस्ट इंडिजच्या संघाला धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. आंद्रे रसेलच्या जागी जेसन मोहम्मदला संघात स्थान देण्यात आलं आहे.
आंद्रे रसेलच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रीया करण्यात आली होती. यामधून सावरुन तो कॅनडात सुरु असलेल्या ग्लोबल टी-२० स्पर्धेत खेळत होता. यादरम्यान रसेलला पुन्हा एकदा त्रास जाणवायला लागल्यामुळे रसेलने भारताविरुद्ध मालिकेमधून माघार घेणं पसंत केलं आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे पहिले दोन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.
अवश्य वाचा – Ind vs WI : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव, विराटने जिंकली चाहत्यांची मनं