शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी रात्री मातोश्री बंगल्यावर जाऊन ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सचिनने पत्नी अंजलीसह मातोश्रीवर काही वेळ घालवला. आपल्या या भेटीत त्याने बाळासाहेबांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि ठाकरे कुटुंबीयांना धीर दिला.
बाळासाहेब यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. पण ही बातमी कळूनही अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यामुळे सचिनला बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते. त्यानंतर त्याने बाळासाहेबांसोबत अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांचा समावेश असलेले छायाचित्र आपल्या फेसबुकवर टाकले होते. मात्र कसोटी संपल्यानंतर मुंबईत परतल्यावर सचिनने थेट ‘मातोश्री’वर धाव घेतली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appease by sachin
First published on: 21-11-2012 at 03:13 IST