ग्रँडमास्टर अरविंद चिदम्बरमने आशियाई कनिष्ठ खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. चुरशीच्या अंतिम फेरीत आघाडीवर असणाऱ्या ग्रँडमास्टर एस. एल. नारायणन आणि इंटरनॅशनल मास्टर मौसवी सेय्यद खलील यांच्यातील लढत बरोबरीत संपली. या निर्णयामुळे अरविंदचा जेतेपदाचा मार्ग सुकर झाला.
तत्पूर्वी अरविंदने निमा जावनबख्तवर मात केली होती. नारायणन आणि अरविंद यांचे प्रत्येकी सात गुण झाले होते. थेट टायब्रेकच्या बळावर अरविंदला विजयी घोषित करण्यात आले. मुलींमध्ये मंगोलियाच्या ययुरिनतया युयर्तसेखने अव्वल मानांकित वैशालीवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. आशियाई कनिष्ठ ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत एस. एल. नारायणनने सुवर्ण तर अर्जुन कल्याणने रौप्य आणि अरविंद चिदम्बरमने कांस्यपदकाची कमाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2016 रोजी प्रकाशित
अरविंदला आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद
ग्रँडमास्टर अरविंद चिदम्बरमने आशियाई कनिष्ठ खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले.
First published on: 12-05-2016 at 04:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aravindh chithambaram