Tokyo 2020 : अवघ्या सहा मनिटात दीपिका कुमारी झाली स्पर्धेबाहेर!

उपांत्यपूर्व फेरीत दीपिकाला दक्षिण कोरियन तिरंदाज अन सानने ०-६ ने पराभूत केले.

Deepika Kumari out of Tokyo Olympics 2020
दीपिका कुमारी

भारताची आघाडीची महिला तिरंदाज दीपिका कुमारीचा टोक्यो ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्यपूर्व फेरीत दीपिकाला दक्षिण कोरियन तिरंदाज अन सानने ०-६ ने पराभूत केले. रशियन ऑलिम्पिक समितीच्या (आरओसी) केन्सिया पेरोवाचा पराभव करून दीपिकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. कोरियन अन सानने पहिल्या फेरीत शानदार सुरुवात केली आणि तीन १०एस असे गुण मिळवले, तर दीपिकाने ७-१०-१० असे गुण मिळवले.

सानने दुसऱ्या फेरीतही ९-१०-७ अशी गती राखली. दुसरीकडे दीपिकाने १०-७-७ असे गुण मिळवले. दक्षिण कोरियाच्नया सानने तिसऱ्या सेटवर वर्चस्व राखत २६ गुण मिळवले. तर दीपिकाला २४ गुण मिळवता आले. सहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत हा सामना संपला. सानचा पुढील सामना अमेरिकेच्या मैकेंजी ब्राउन किंवा मेक्सिकोच्या एलेजांद्रा वालेंसियाशी होईल.

हेही वाचा – Tokyo 2020 : काय सांगता..! कंडोममुळं ‘तिनं’ जिंकलं मेडल

 

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दीपिका कुमारीने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली होती. तिने रशियाच्या सेनिया पेरोवाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने हा सामना ६-५ ने जिंकला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Archer deepika kumari out of tokyo olympics 2020 adn