Aryna Sabalenka: वर्ल्डची नंबर १ खेळाडू असलेल्या सबालेन्काने युएस ओपन स्पर्धेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून तिने आपल्या युएस ओपन जेतेपदाचा यशस्वी बचाव केला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तिने एनिसोवाचा ६-३, ७-६(३) ने पराभव केला आहे. हे तिच्या टेनिस कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम ठरले आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. सबालेन्काने या सामन्यातही आक्रमक खेळ केला. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये खेळताना सबालेन्काला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या सेटमध्येही तिचा संघर्ष सुरू होता. या विजयासह तिने आपलं रँकिंगमध्ये असलेलं अव्वल स्थान कायम ठेवलं. तर पराभवानंतर एनिसोवाला रँकिंगमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ती महिला खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी जाऊन पोहोचली आहे.
हा विजय सबालेन्कासाठी अतिशय खास ठरला. या विजयासह तिने अनेक मोठे विक्रमही आपल्या नावे केले आहेत. ती ग्रँडस्लॅम मधील पहिली अशी महिला खेळाडू आहे जी हार्ड कोर्टवर खेळताना ४ ग्रँडस्लॅम जिंकू शकली आहे. या विक्रमात तिने किम क्लीस्टरची बरोबरी केली आहे. ओसाकाने आपल्या कारकिर्दीत २०१८,२०२०, २०१९ आणि २०२१ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता.
यासह तिच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. सबालेन्का ही केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे जी अंतिम सामना जिंकून ग्रँडस्लॅममध्ये खेळताना १०० सामने जिंकली आहे. याआधी दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्सने महिलांच्या एकेरी फेरीत सलग दोन वेळेस जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. आता हा विक्रम सबालेन्काच्या नावावर नोंदवला गेला आहे.