‘‘भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडला पराभूत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र संघाची बाजू आणखी बळकट करण्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये रवीचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजाला स्थान दिले पाहिजे,’’ असे मत ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले.
‘‘जर स्टुअर्ट बिन्नी याला पुरेशी षटके गोलंदाजी दिली जात नसेल तर त्याचा या संघासाठी काय उपयोग आहे. खरे तर पहिल्या दोन्ही कसोटीत अश्विनचा समावेश करण्याची आवश्यकता होती. अश्विनला संधी न देता मुरली विजय याला ऑफ-स्पिन गोलंदाजीची जबाबदारी देणे ही अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे,’’ असे बेदी यांनी सांगितले.
दुसऱ्या कसोटीतील विजयाबाबत बेदी म्हणाले, ‘‘या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या चुका भारताच्या पथ्यावर पडल्या. भारताच्या विजयात या चुकांचाच सिंहाचा वाटा आहे.’’