Asia Cup 2025 Full Schedule: आशिया कप २०२५ स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग होते, पण अखेर आशिया कप २०२५ चा मार्ग मोकळा झाला. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आता आशिया कप २०२५ चं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे,
संपूर्ण स्पर्धा बीसीसीआयच्या यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन, यावेळी आशिया कप टी-२० स्वरूपात खेळवला जाईल, ज्यामध्ये अंतिम सामन्यासह एकूण १८ सामने खेळवले जातील.
स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत आणि ८ संघांना २ गटात विभागले जाईल. पाकिस्तान व्यतिरिक्त, टीम इंडियासह यूएई आणि ओमान यांना अ गटात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत. प्रत्येक गटातील २ संघ सुपर-४ फेरीत जातील, जिथे प्रत्येक संघ इतर ३ संघांविरूद्ध एकदा खेळेल. यातील अव्वल २ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. पहिला सामना अफगाणिस्तान वि. हाँगकाँग या संघांमघ्ये होईल. टीम इंडिया १० सप्टेंबर रोजी युएईविरूद्ध सामन्याने स्पर्धेच्या मोहिमेला सुरूवात करेल. त्यानंतर पुढच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होईल. हा सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय संघ १९ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळेल.
आशिया कप २०२५ मधील २ गट
अ गट – भारत, पाकिस्तान, युएई, ओमान
ब गट – श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग
आशिया कप २०२५ मधील भारताचं वेळापत्रक
१० सप्टेंबर (बुधवार): भारत विरुद्ध युएई
१४ सप्टेंबर (रविवार): भारत विरुद्ध पाकिस्तान
१९ सप्टेंबर (शुक्रवार): भारत विरुद्ध ओमान
आशिया कप २०२५ चं संपूर्ण वेळापत्रक
९ सप्टेंबर (मंगळवार): अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
१० सप्टेंबर (बुधवार): भारत विरुद्ध युएई
११ सप्टेंबर (गुरुवार): बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
१२ सप्टेंबर (शुक्रवार): पाकिस्तान विरुद्ध ओमान
१३ सप्टेंबर (शनिवार): बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१४ सप्टेंबर (रविवार): भारत विरुद्ध पाकिस्तान
१५ सप्टेंबर (सोमवार): श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
१६ सप्टेंबर (मंगळवार): बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
१७ सप्टेंबर (बुधवार): पाकिस्तान विरुद्ध युएई
१८ सप्टेंबर (गुरुवार): श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
१९ सप्टेंबर (शुक्रवार): भारत विरुद्ध ओमान