सिल्हेट : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला शुक्रवारी महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. निदा दारच्या (नाबाद ५६ धावा व २ बळी) अष्टपैलू खेळामुळे पाकिस्तानने १३ धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय संघाची या स्पर्धेतील आणि पाकिस्तानविरुद्धची विजयाची मालिका खंडित झाली. भारताने यंदाच्या स्पर्धेतील सलग तीन सामने जिंकले होते. तसेच या दोन संघांमधील गेल्या पाचही ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताने विजय नोंदवला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताच्या फलंदाज आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या. भारताची एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा ओलांडू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १३७ अशी धावसंख्या केली आणि प्रत्युत्तरात भारताचा डाव १९.४ षटकांत १२४ धावांत आटोपला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. त्यांची पॉवर-प्लेच्या सहा षटकांअंती ३ बाद ३३ अशी स्थिती होती. परंतु निदा दार (नाबाद ५६) आणि कर्णधार बिस्मा मरूफ (३२) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. बिस्माला रेणुका सिंहने बाद केल्यानंतरही निदाने एक बाजू लावून धरत पाकिस्तानला १४० धावांसमीप पोहोचवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup cricket tournament indian women lost ysh
First published on: 08-10-2022 at 00:02 IST