Afghanistan vs Hongkong Asia Cup 2025 Match Updates in Marathi: अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने आशिया चषक २०२५ला सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूने वादळी फटकेबाजी केली आहे. अझमतुल्ला ओमरझाईच्या दमदार अर्धशतकामुळे संघ चांगली धावसंख्या उभारू करू शकला.

अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने काही विकेट झटपट विकेट गमावले. पण अझमतुल्ला ओमरझाईच्या फटकेबाजीने सदिकुल्ला अटलच्या कमालीच्या फलंदाजीने अफगाण संघाने पहिल्याच सामन्यात १७८ धावांचा डोंगर उभारला.

अझमतुल्ला ओमरझाई सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि ओमरझाईने अवघ्या २० चेंडूत २ चौकार आणि पाच षटकारांसह अर्धशतक केलं. ओमरझाईच्या वादळी फटकेबाजीमुळे धावांची गरज असलेल्या अफगाणिस्तानसाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. ओमरझाईने १९व्या षटकात तर षटकारांची हॅटट्रिक केली. त्याने पहिल्या ३ चेंडूवर षटकार लगावले तर चौथ्या चेंडूवर चौकार लगावला आणि ४ चेंडूत २२ धावा केल्या. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.

ओमरझाई आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

ओमरझाई हा अफगाणिस्तानसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी गुलबदीन नायब आणि मोहम्मद नबी यांनी २१ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला. याशिवाय आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

अजमतुल्ला ओमरझाईच्या आधी हा विक्रम भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. २०२२ मध्ये सूर्यकुमार यादवने फक्त २२ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. पण आता अजमतुल्ला ओमरझाईने त्याला मागे टाकलं आहे.

अजमतुल्लाह ओमरझाई व्यतिरिक्त, सेदिकुल्लाह अटलनेही शानदार खेळी केली. सलामीवीर म्हणून खेळताना त्याने ५२ चेंडूत ७३ धावा केल्या आणि नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. सेदिकुल्लाह अटलच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, मोहम्मद नबीनेही ३३ धावांचे योगदान दिले. सेदिकुल्लाह अटलला हाँगकाँगने ३ वेळा जीवनदान दिले.