Hong Kong vs Bangladesh, Playing 11: आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील सुरूवातीचे दोन्ही सामने एकतर्फी राहिले आहेत. आता स्पर्धेतील तिसऱ्या लढतीत बांगलादेश आणि हाँगकाँग हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हाँगकाँग संघातून खेळणार भारतीय वंशाचे ३ खेळाडू
या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या हाँगकाँग संघाची जबाबदारी यासिम मुर्तजाकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान बांगलादेशविरूद्धच्या सामन्यासाठी हाँगकाँगने आपल्या मजबूत प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या संघात भारतीय वंशाच्या ३ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ज्यात किंचित शाह, आयुष शुक्ला आणि अंशुमन राठ यांचा समावेश आहे. आता भारतीय वंशाचे खेळाडू हाँगकाँगकडून खेळताना बांगलादेशविरूद्ध कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी बांगलादेशने आपल्या प्लेइंग ११ मध्ये ३ वेगवान गोलंदाज, २ फिरकीपटू आणि ६ फलंदाजांना स्थान दिलं आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येक सामन्यात आम्ही आमचं १०० टक्के देऊ, असं बांगलादेशचा कर्णधार लिटन दास म्हणाला.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
बांगलादेश: लिटन दास (यष्टिरक्षक/कर्णधार), परवेज हुसेन इमोन, तांझीद हसन तमीम, तौहीद हृदॉय, शमिम हुसेन, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, तांझीम हसन साकिब, तास्किन अहमद, मुस्ताफिजूर रहमान
हाँगकाँग: यासिम मुर्तजा (कर्णधार), झीशान अली (यष्टिरक्षक), अंशुमन राठ, बाबर हयात, निझाकत खान, कल्हान चल्लू, किंचित शाह, ऐझाज खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतीक इक्बाल