इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा पाचवा दिवस भारतासाठी काहीसा निराशाजनक गेला. ट्रॅप नेमबाजीत भारताच्या १५ वर्षीय शार्दुल विहानने मिळवलेलं रौप्यपदक आणि टेनिसमध्ये भारताच्या अंकिता रैनाला मिळालेलं कांस्यपदक याव्यतिरीक्त अन्य भारतीय खेळाडूंनी निराशा केली. ट्रॅप नेमबाजीमध्ये भारताचे अंकुर मित्तल आणि शार्दुल विहान हे दोन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. मात्र अंकुर मित्तल पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडला. अखेरच्या क्षणांमध्ये शार्दुलने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्याला यश आलं नाही. नेमबाजीत भारताचं हे आतापर्यंतचं आठवं पदक ठरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या झ्यांग शुईकडून पराभवाचा सामना करावा लागला. शुईने रैनावर ४-६, ७-६ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. अटीतटीच्या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ६-३, १०-८ अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे.

याव्यतिरीक्त बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी आपले पहिले सामने जिंकत पुढच्या फेरीमध्ये  प्रवेश केला आहे.  मात्र वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या सर्व खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. जलतरण आणि रोविंग (नौकानयन) या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र पदकं मिळवण्यात ते अपयशी ठरले.

Live Blog

Highlights

  • 14:57 (IST)

    नेमबाजीत भारताला आणखी एक पदक

    ??????????? ????? ???????? ????????? ??????? ??????? ????????, ????????? ?????????? ??????? ???? ???

  • 12:24 (IST)

    टेनिस महिला - अंकिता रैनाला कांस्यपदक

    ??????? ?????? ???? ??????? ????? ??????? ?-?, ?-? ?? ??????. ??????? ????????? ?????????? ???????? ???????????? ?????? ?????? ??????.

  • 12:22 (IST)

    टेनिस - पुरुष दुहेरी

    ???? ??????? ??? ????? ??? ?????? ?????????? ????? ???????? ?????? ???. ?-?, ?-?. ??-? ?? ???? ???. ??????? ?????????? ?? ???????? ???????

  • 09:53 (IST)

    नेमबाजी - (महिला)

    ??? ????? ??????? ???????? ??????? ???? ??? ????? ????? ???? ????? ?????. ??????? ?????? ??? ?????

  • 09:46 (IST)

    जलतरण- (पुरुष)

    ??? ??. ?????????? ???????? ??????? ??????? ????? ????? ????? ????

  • 09:45 (IST)

    रोविंग - (नौकानयन)

    ??????????? ??? ?????? ???????? ???????? ?? ?????? ??? ?????? ???? ????? ????????? ?????? ??? ???????? ?????? ?????. 

    ??????? ???? ??? ????? ???? ?????? ?.?? ?????????? ?????? ????????? ??????.

    ????? ??? ?????? ???????? ????????? ????? ???????? ????? ??? ???? ?????? ??????? ?????????? ?????? ?????? ?????.

  • 08:41 (IST)

    रोविंग - (नौकानयन)

    ????? ?????? ???????? ??????? ????? ????? ????? ????? ??????? ????????

19:36 (IST)23 Aug 2018
मिक्स डबल टेनिस

रोहन बोपन्ना आणि अंकिता रैना या जोडीचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.  इंडोनेशियाच्या जोडीने ४-६, ६-१, ६-१० च्या फरकाने रोहन बोपन्ना आणि अंकिता रैना यांचा पराभव केला. 

18:59 (IST)23 Aug 2018
स्क्वॅश - महिला

भारताची दिपीका पल्लिकल उपांत्यपूर्व फेरीत दाखल

18:28 (IST)23 Aug 2018
स्क्वॅश

उपांत्यपूर्व सामन्यात भारताचे सौरव घोषाल आणि हरिंदरपाल संधू एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार. स्क्वॅशमध्ये भारताचं एक पदक निश्चीत

18:04 (IST)23 Aug 2018
जलतरण - २०० मी. बॅकस्ट्रोक

भारताचा श्रीहरी नटराज अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर

18:04 (IST)23 Aug 2018
बॅडमिंटन - मिश्र दुहेरी

भारताची प्रणव चोप्रा-सिकी रेड्डी जोडी पराभूत

18:00 (IST)23 Aug 2018
जलतरण - ५० मी बटरफ्लाय

भारताचा वीरधवल खाडे अंतिम फेरीत आठव्या स्थानावर

16:43 (IST)23 Aug 2018
टेनिस - पुरुष

भारताचं आणखी एक पदक निश्चीत, प्रंजेश गुणशेखरन उपांत्य फेरीत दाखल

16:42 (IST)23 Aug 2018
बॅडमिंटन - मिश्र दुहेरी

सत्विकसाईराज रणकीरेड्डी आणि आश्विनी पोनाप्पा जोडी पहिल्याच सामन्यात पराभूत

15:42 (IST)23 Aug 2018
बॅडमिंटन - महिला एकेरी

सायना नेहवालची इराणच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात, २१-७, २१-९ च्या फरकाने जिंकला सामना

15:41 (IST)23 Aug 2018
बॅडमिंटन

मनु अत्री - सुमीत रेड्डी जोडीची मालदिवच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात

15:01 (IST)23 Aug 2018
नेमबाजी - महिला

वर्षा वर्मन, श्रेयसी सिंह पदकाच्या शर्यतीमधून बाहेर

14:59 (IST)23 Aug 2018
तिरंदाजी - पुरुष

भारताचा अतानु दास उपांत्यपूर्व फेरीमधून बाहेर

14:58 (IST)23 Aug 2018
वेटलिफ्टींग - पुरुष

सतिशकुमार शिवलींगम, अजय सिंह आपापल्या वजनी गटात पदकांच्या शर्यतीमधून बाहेर. वेटलिफ्टींगमध्ये आज भारताला पदक नाही

14:57 (IST)23 Aug 2018
नेमबाजीत भारताला आणखी एक पदक

पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या शार्दुल विहानला रौप्यपदक, आतापर्यंत नेमबाजीतलं भारताचं आठवं पदक

14:17 (IST)23 Aug 2018
कबड्डी - महिला

भारतीय महिला अंतिम फेरीत दाखल. उपांत्य सामन्यात चीन तैपेईवर २७-१४ च्या फरकाने केली मात

13:53 (IST)23 Aug 2018
बॅडमिंटन - महिला एकेरी

अटीतटीच्या लढतीत पी. व्ही. सिंधूची व्हिएतनामच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात

13:52 (IST)23 Aug 2018
नेमबाजी - पुरुष

ट्रॅप नेमबाजीत भारताचा विहान शार्दुल अंतिम फेरीत दाखल. अंकुर मित्तल अंतिम फेरीत दाखल होण्यात अपयशी

12:24 (IST)23 Aug 2018
टेनिस महिला - अंकिता रैनाला कांस्यपदक

भारताची अंकिता रैना चीनच्या झ्यँग शुईकडून ४-६, ७-६ ने पराभूत. उपांत्य फेरीतल्या पराभवामुळे अंकिताला कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान.

12:22 (IST)23 Aug 2018
टेनिस - पुरुष दुहेरी

रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीची अटीतटीच्या लढतीत जपानच्या जोडीवर मात. ४-६, ६-३. १०-८ ने केली मात. भारताचं टेनिसमध्ये एक रौप्यपदक निश्चीत

12:20 (IST)23 Aug 2018
बॅडमिंटन - महिला दुहेरी

आश्विनी पोनाप्पा - एन. सिकी रेड्डी जोडीची हाँक काँगच्या प्रतिस्पर्ध्यावर २१-१६, २१-१५ ने मात

09:53 (IST)23 Aug 2018
नेमबाजी - (महिला)

डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारात श्रेयसी सिंह आणि वर्षा वर्मन जोडी अंतिम फेरीत. भारताची पदकाची आशा वाढली

09:48 (IST)23 Aug 2018
व्हॉलिबॉल - (महिला)

भारतील महिला कझाकिस्तानविरुद्ध सरळ ३ सेट्समध्ये पराभूत. 

09:47 (IST)23 Aug 2018
स्क्वॅश

भारताच्या सौरव घोषालची श्रीलंकेच्या शमिल मुक्तारवर ३-० ने मात

09:46 (IST)23 Aug 2018
जलतरण- (पुरुष)

२०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात भारताचा श्रीहरी नटराज अंतिम फेरीत दाखल

09:45 (IST)23 Aug 2018
रोविंग - (नौकानयन)

पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात भारतच्या ओम प्रकाश आणि स्वर्ण सिंह यांचं कांस्यपदक अवघ्या एका गुणाच्या फरकाने हुकलं. 

गुरिंदर सिंह आणि मलकित सिंह जोडीने ०.३३ सेकंदाच्या फरकाने कांस्यपदक गमावलं.

महिला डबल स्कल्स प्रकारात भारताच्या सायली राजेंद्र शेळके आणि पुजा जोडीला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

09:42 (IST)23 Aug 2018
जलतरण- (पुरुष)

१०० मी. फ्रिस्टाईल प्रकारात भारताचे अॅरोन डिसुझा आणि वीरधवल खाडे यांचं आव्हान संपुष्टात

08:42 (IST)23 Aug 2018
जलतरण - (पुरुष)

५०. मी बटरफ्लाय प्रकारात वीरधवल खाडे अंतिम फेरीत दाखल. अंशुल कोठारीचं आव्हान संपुष्टात

08:41 (IST)23 Aug 2018
रोविंग - (नौकानयन)

सिंगल स्कल्स प्रकारात भारताचा दत्तू भोकनळ अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2018 indonesia day 5 live updates
First published on: 23-08-2018 at 07:31 IST