Asian Games 2023, Aditi Ashok: भारताची स्टार महिला गोल्फपटू अदिती अशोकने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. रविवारी (१ ऑक्टोबर) तिने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात कोणतेही पदक जिंकणारी आदिती ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. या स्पर्धेच्या या आवृत्तीत गोल्फमध्ये भारताचे हे पदक आहे. सुवर्णपदक जिंकण्यापासून ती नक्कीच हुकली, पण तिने एक मोठी कामगिरी करत आपल्या नावावर ऐतिहासिक नोंद केली.

अदितीला रविवारी महिला गोल्फ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपली लय राखता आली नाही. तिने अप्रतिम फटका मारला मात्र, तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अदितीने तिसऱ्या फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर सात शॉट्सची मोठी आघाडी घेतली होती. एका बर्डीविरुद्ध चार बोगी आणि एक दुहेरी बोगी करून तिने ही आघाडी गमावली आणि दुसऱ्या स्थानावर घसरली. अदिती सुवर्णपदकापासून वंचित राहिली पण दोन वेळच्या ऑलिम्पियन खेळाडूने अदितीला हरवले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती थोड्या फरकाने मागे राहून चौथ्या स्थानावर राहिली होती.

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Ruturaj Gaikwad's second century in IPL
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

जपानमध्ये झालेल्या २०२१ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीमुळे अदिती अशोक ही चर्चेत आली होती. त्यावेळी अदितीला काही गुणांच्या फरकाने पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र, कामगिरीत सातत्य ठेवत अदितीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. आता तिला सुवर्णपदकाने जरी हुलकावणी दिली असली तरी रौप्य पदक पटकावत अदितीने नव्या इतिहासाला गवसणी घातली आहे.

भारताचे गोल्फमधील चौथे वैयक्तिक पदक

भारताचे गोल्फमधील हे चौथे वैयक्तिक पदक ठरले. लक्ष्मण सिंग आणि शिव कपूर यांनी १९८२ आणि २००२ च्या हंगामात सुवर्णपदक जिंकले तर राजीव मेहता यांनी नवी दिल्ली (१९८२) मध्ये रौप्यपदक जिंकले. लक्ष्मण, राजीव, ऋषी नारायण आणि अमित लुथरा यांच्या भारतीय संघाने १९८२ मध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. २००६ आणि २०१०च्या मोसमात दोहा आणि ग्वांगझू येथे झालेल्या सांघिक स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले होते.

थायलंडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले

२५ वर्षीय आदितीचा एकूण स्कोअर १७ अंडर २७१ होता. थायलंडच्या अर्पिच्य युबोलने तिच्या आठवड्यातील सर्वोत्तम कार्ड ६४ स्कोअरसह सुवर्णपदक जिंकले. कोरियाच्या ह्युनजो यूनेही ६५ स्कोर करत शानदार कार्ड खेळून कांस्यपदक जिंकले. अदितीचा ७३चा स्कोअर असणारे कार्ड तिने खेळले आणि त्याचा फटका तिला बसला आणि त्यामुळे तिचा स्कोअर हा ६४च्या पुढे गेला आणि तिचे सुवर्णपदक हुकले.

हेही वाचा: World Cup 2023: इकॉनॉमी क्लासमध्ये इंग्लंडने केला ३८ तासांचा प्रवास अन् सामन्यावर पावसाने फिरवले पाणी; बेअरस्टो नाराज

प्रणवी आणि प्रशांत यांची निराशजनक कामगिरी

या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर दोन भारतीय महिला प्रणवी उर्स (१३वे स्थान) आणि अवनी प्रशांत (जो १८ वे स्थान) यांनीही शेवटच्या दिवशी निराशा केली. प्रणवीने ७५ तर अवनीने ७६चे कार्ड खेळल्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत चौथ्या स्थानावर घसरला आणि त्यांचे पदक हुकले.