Australia vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वादळी शतक झळकावले. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूत १४ चौकार आणि ९ षटकारांसह १६३ धावा केल्या. आपल्या शतकाच्या जोरावर वॉर्नरने पुन्हा एकदा दाखवून दिले की, तो शतकांच्या बाबतीत सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मापेक्षा कितीतरी पुढे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून वॉर्नरचे हे ४७ वे शतक होते.

भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत, पण एक सलामीवीर म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके झळकावली आहेत. मात्र, डेव्हिड वॉर्नरचा आकडा आता ४७ शतकापर्यंत पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ज्याने सलामी फलंदाज म्हणून एकूण ४२ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. या यादीत पुढे जात श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या ४१ शतकांसह चौथ्या स्थानावर आहे, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन ४० शतकांसह पाचव्या आणि रोहित शर्मा ४० शतकांसह सहाव्या स्थानावर आहे.

IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज –

४७ शतके – डेव्हिड वॉर्नर<br>४५ शतके – सचिन तेंडुलकर
४२ शतके – ख्रिस गेल
४१ शतक – सनथ जयसूर्या
४० शतके – मॅथ्यू हेडन
४० शतके – रोहित शर्मा

हेही वाचा – AUS vs PAK: १३ वर्षांनंतर शाहीन आफ्रिदीने सासऱ्याच्या पराक्रमाची केली पुनरावृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या ५ विकेट्स

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय कारकिर्दीतील २१वे शतक तर मार्शने दुसरे शतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानी खेळाडूंना खूप हैरान केले. वॉर्नर आणि मार्श यांनी मिळून ऑस्ट्रेलियासाठी इतिहासही रचला. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी एका सामन्यात शतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्शबद्दल बोलायचे तर त्याने शतक झळकावून वाढदिवसाला खास बनवले. त्याच्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.

वॉर्नर आणि मार्शने केला नवा विक्रम –

डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी २५९ धावांची भागीदारीही केली. दोघांनी मिळून १२ वर्ष जुना विक्रम मोडला. याच मैदानावर २०११ च्या विश्वचषकात शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांनी कॅनडाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी केली होती.