लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : परदेशी विद्यार्थ्यांना मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश न देण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिला. युजीसीच्या नियमावलीनुसार भारतात राहणारेच मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र असल्याचे युजीसीने स्पष्ट केले.

ugc allows colleges universities to admit students
विद्यापीठात घेता येणार वर्षातून दोनदा प्रवेश, विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा? निर्णयामागील कारण काय?
BMS, admission, collapse,
‘बीएमएस’ प्रवेश कोलमडणार
last day for registration for degree courses
पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या नोंदणीसाठी उद्या शेवटचा दिवस
The number of students giving the NEET exam in Marathi decreased
विद्यार्थ्यांचेच मराठीकडे ‘नीट’ दुर्लक्ष; मराठीतील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत साशंकता
cet exam for five year law question and answer tables made available on website
विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा: विद्यार्थ्यांना आक्षेपासाठी प्रश्न व उत्तर तालिका उपलब्ध
26480 seats available for fyjc admissions In nashik
नाशिक : जिल्ह्यातील जागा वाढण्याची शक्यता; इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया
Admission Process for Degree Courses Begins Pre-Admission Online Registration Till 10th June
पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू, १० जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी
loksatta analysis why are doctors in south korea on strike
विश्लेषण : दक्षिण कोरियातील डॉक्टर संपावर का आहेत?

युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. युजीसीच्या मुक्त आणि दूरस्थ, ऑनलान अभ्यासक्रम नियमावली २०२०मध्ये प्रवेश पात्रता नमूद करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही भागात राहणारा विद्यार्थी युजीसीच्या मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतील मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमाअंतर्गत कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी संस्थेतील प्रादेशिक कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक असल्याचे या नियमावलीत नमूद केले आहे. तसेच फ्रँचाइज शिक्षण संस्थांतर्फे चालवले जाणारे ऑफ कॅम्पस, मुक्त विद्यापीठांच्या दूरस्थ अभ्यासक्रमांचे अभ्यास केंद्र, शैक्षणिक संस्थांचे प्रसार अभ्यासक्रम आणि नियामक मान्यतेशिवाय राबवले जाणारे अभ्यासक्रम यासाठी विद्यार्थी व्हिसा दिला जाणार नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-विवाहाच्या आमिषाने चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार

या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांनी मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच युजीसी नियमावली २०२०नुसार भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक अधिकारक्षेत्राची पूर्तता करून मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.