पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.ऑस्ट्रेलियाने त्यांच्या भूमीवर झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा ४-० असा धुव्वा उडविला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता भारताला मिळणार आहे. कानपूर, चेन्नई, दिल्ली आणि मोहालीमध्ये हे चार कसोटी सामने रंगणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी दिली. पाहुणा संघ भारतात काही सराव सामनेही खेळणार आहे. पण या दौऱ्यात एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश नाही, असे ते पुढे म्हणाले. या दौऱ्याचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
First published on: 17-11-2012 at 01:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia cricket team coming india to play for 4 test in february