दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४३० धावांचे अवघड लक्ष्य दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४ महत्त्वपूर्ण बळी मिळवत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. ५ बाद १११ वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने माइक हसीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दुसरा डाव ८ बाद २६७ वर आपला डाव घोषित केला.
मायकेल क्लार्कने ३८, तर जेम्स पॅटिन्सनने २९ धावा केल्या. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. ग्रॅमी स्मिथ शून्यावरच तंबूत परतला. हशीम अमला, अलविरो पीटरसन आणि जॅक रुडॉल्फ या तिघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले.
चौथ्या दिवसाअखेर आफ्रिकेची ४ बाद ७७ अशी अवस्था आहे. ए बी डीव्हिलियर्स १२, तर फॅफ डू प्लसी १९ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला कसोटी तसेच मालिका जिंकण्यासाठी सहा विकेट्सची आवश्यकता आहे, तर आफ्रिकेला ३५३ धावा करायच्या आहेत.